(Source: ECI/ABP News/ABP Majha)
suicide attack in Pakistan : पाकिस्तानमध्ये दोन बाॅम्बस्फोटात भीषण रक्तपात; बलुचिस्तानातील एक जिल्हा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा टार्गेटवर
बलुचिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील एका मशिदीजवळ प्रेषित मुहम्मद यांचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी लोक जमले असताना स्फोट झाला. बलुचिस्तानमधील अधिकाऱ्यांनी आत्मघाती हल्ल्यानंतर आणीबाणी जाहीर केली आहे.
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानमध्ये (suicide attack in Pakistan) बलुचिस्तानमध्ये मस्तुंगमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 50 जण ठार झाले आहेत. तसेच 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील एका मशिदीजवळ आज (29 सप्टेंबर) प्रेषित मुहम्मद यांचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी लोक जमले असताना स्फोट झाला. बलुचिस्तानमधील अधिकाऱ्यांनी आत्मघाती हल्ल्यानंतर आणीबाणी जाहीर केली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू
दरम्यान, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावर शहराजवळील मशिदीमध्येही (suicide attack in Pakistan) अन्य एक स्फोट झाला. पेशावरजवळील हंगू येथील मशिदीत मृतांची संख्या अद्याप समजलेली नाही. परंतु, छत कोसळल्यानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हंगूमधील मशीद 40 ते 50 लोकांची क्षमता असलेल्या पोलिस संकुलाचा भाग आहे. बलुचिस्तानचे पोलिस प्रमुख अब्दुल खालिक शेख यांनी हा स्फोट आत्मघातकी स्फोट असल्याची पुष्टी केली. हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
#UPDATE At least 25 people were killed and dozens more wounded on Friday by a suicide bomber targeting a procession marking the birthday of Islam's Prophet Mohammed in Pakistan's southwestern Balochistan province ➡️ https://t.co/nUjUNhJnH9 pic.twitter.com/iNG84PPZpW
— AFP News Agency (@AFP) September 29, 2023
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत
पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती म्हणाले की, हा स्फोट अतिशय घृणास्पद कृत्य आहे. त्यांनी बलुचिस्तान आणि हंगूमधील "दहशतवादी हल्ले" असल्याचे सांगत निषेध केला. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. तेहरिक-ए तालिबान पाकिस्तान (TTP) किंवा पाकिस्तानी तालिबान आणि इस्लामिक स्टेट गटासह दहशतवाद्यांकडून वारंवार फटका बसला आहे.
तथापि, टीटीपीने शुक्रवारच्या स्फोटात सहभाग नाकारला आहे. असा हल्ला त्यांच्या धोरणांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात झालेल्या स्फोटात एका प्रमुख मुस्लिम नेत्यासह किमान अकरा जण जखमी झाले होते. जुलैमध्ये, उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका धार्मिक राजकीय पक्षाच्या मेळाव्यात झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 40 हून अधिक लोक ठार झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या