एक्स्प्लोर

श्रीलंकेच्या राजकारणात खळबळ, महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

लंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटविले आहे. 72 वर्षीय राजपक्षे यांनी शपथ घेतल्यानंतर सिरिसेना यांच्यासोबत एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी ‘‘श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.’’, असा संदेश देखील दिला आहे.

कोलंबो: श्रीलंकेत राजकीय घडामोडींना वेगळे नाटकीय वळण आले असून लंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटविले आहे. 72 वर्षीय राजपक्षे यांनी शपथ घेतल्यानंतर सिरिसेना यांच्यासोबत एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी ‘‘श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली’’, असा संदेश देखील लिहिला आहे. सिरिसेना यांच्या युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायंस (यूपीएफए) ने घोषणा करत सध्याच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही पार्टी आतापर्यंत युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) सोबत होती, ज्या पक्षाचे नेते रानिल विक्रमसिंघे पंतप्रधानपदावर विराजमान होते. यूपीएफएने पाठिंबा काढल्यामुळे विक्रमसिंघे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. यापूर्वी जवळपास एक दशक राजपक्षे यांचे सरकार होते. त्यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या सिरिसेना यांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली. राजकीय विश्लेषकांच्या मते राजपक्षे यांना पंतप्रधान करण्याच्या सिरिसेना यांच्या निर्णयाला संवैधानिक अडचणी येऊ शकतात. कृषिमंत्री आणि यूपीएफएचे महासचिव महिंदा अमरवीरा यांनी राजपक्षे यांच्या नियुक्तीबाबत संसदेला माहिती दिली. या संपूर्ण घडामोडीवर बोलताना वित्तमंत्री मंगला समरवीरा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान म्हणून राजपक्षे यांची नियुक्ती असंविधानिक आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले असून हे एक असंविधानिक सत्तापालट असल्याचे म्हटले आहे. 2015 साली विक्रमसिंघे यांच्या पाठिंब्याने सिरिसेना राष्ट्रपती बनले होते. सिरीसेना यांच्या निर्णयामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. विक्रमसिंघे यांना हटवून राजपक्षे यांना पंतप्रधान बनवण्यात आले असले तरी बहुमत नसल्याने कोंडी होणार आहे. राजपक्षे आणि श्रीसेना यांच्या पक्षांकडे मिळून 95 जागांचे बळ असून बहुमतापासून ते बरेच दूर आहेत. दुसरीकडे विक्रमसिंघे यांच्या यूएनपी पक्षाकडे 106 जागा असून बहुमतासाठी आणखी 7 जागांची त्यांना आवश्यकता आहे.  या राजकीय घडामोडींवर विक्रमसिंघे यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी येत्या काळात लंकेच्या राजकारणात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

Embed widget