एक्स्प्लोर
तिरंगा हाती, फिनलंडमध्ये शीतल महाजनांची 5 हजार फुटावरुन जम्प
भारताचा तिरंगा घेऊन स्काय डाईव्हर शीतल महाजन यांनी फिनलंडमध्ये 5 हजार फूट उंचीवरुन विमानातून उडी मारली.

मुंबई : पुण्याच्या स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी फिनलंडमध्ये देशाची मान अभिमानाने उंचावली. भारताचा तिरंगा घेऊन महाजन यांनी 5 हजार फूट उंचीवरुन विमानातून उडी मारली. फिनलंडमधील भारतीय दूतावासात भारतीय राजदूत वाणी राव यांनी शीतल महाजन यांना सन्मानाने भारताचा झेंडा दिला. फिनलंड स्कायडायव्हिंग सेंटरवरुन 15 ऑगस्टला त्यांनी विमानातून भरारी घेतली. पाच हजार फूट उंचावर गेल्यावर भारताचा झेंडा हातात घेऊन शीतल महाजनांनी जम्प केली. पॅराजम्पिंग सारख्या साहसी खेळात शीतल महाजन यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. स्काय डायव्हिंगमध्ये 18 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रम करणारी पहिली भारतीय महिला असण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. यापूर्वी थायलंडमधील स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये 13 हजार फुटांवरुन नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग केलं होतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण






















