Pakistan Latest News: पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे नेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान बनले आहेत. संयुक्त विरोधी पक्षाकडून शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यात आले. शाहबाज शरीफ यांनी आज देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शाहबाज शरीफ यांना सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांनी शपथ दिली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज भावूक झाल्या होत्या.
राष्ट्रपती आरिफ अल्वी हे शाहबाज यांना शपथ देणार होते. मात्र त्यांनी अस्वस्थ असल्याचं सांगत पंतप्रधान शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. अल्वी हे इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अल्वी यांच्या जागी सादिक संजरानी यांनी शाहबाज यांना शपथ दिली.
शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यांच्या बाजूने 174 मते पडली. त्याचवेळी इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयचे खासदार उपस्थित नव्हते. पीटीआयने या संपूर्ण प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.
देशाच्या 22व्या पंतप्रधानांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवण्यात आले आणि ते पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत ज्यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे हटवण्यात आले आहे. इम्रान खान यांनी 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ 10 एप्रिल 2022 पर्यंत 1,332 दिवसांचा होता. इम्रान खान तीन वर्षे सात महिने आणि 23 दिवस पंतप्रधान राहिले.
इतर महत्वाच्या बातम्या:
- गलती से मिस्टेक हो गया! सभापतींनी पंतप्रधानांचेच नाव चुकवले, शहबाजऐवजी नवाज शरीफ यांच्या नावाची केली घोषणा
- Breaking: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड
- Pakistan New Prime Minister: राजीनामा देत 'इम्रान खान' यांनी पाकिस्तानी संसदेतून केलं वॉकआउट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha