New Prime Minister Of Pakistan: पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची पाकिस्तनाच्या पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली आहे. इम्रान खान यांचे सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर शाहबाज आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. शाहबाज यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इतर पक्षांनी त्यांची नेतेपदी निवड केली आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील मोठा चेहरा आहे. ते पंजाबचे मुख्यमंत्री (पाकिस्तानमधील) देखील होते आणि त्यांचे भाऊ नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आहेत. तत्पूर्वी  इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने घरावर बहिष्कार टाकला. शाहबाज रात्री 8 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शाहबाज हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान बनले आहेत.


पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी संसदेत संबोधित केले. ते म्हणाले की, पाकिस्तानात पहिल्यांदाच अविश्वास ठराव झाला आणि पंतप्रधानांनी खुर्ची गमावली. मी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. त्यांनी कायदा कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कठोर संदेश दिला आहे. आठवडाभर सुरू असलेले नाट्य अखेर संपले, असं ते यावेळी म्हणाले आहेत.


दोन दिवसांपूर्वी (शनिवारी) नॅशनल असेंब्लीत (Pakistan National Assembly) इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर आज नॅशनल असेंब्लीमध्ये नवीन पंतप्रधान निवडीसाठी मतदान झाले, ज्यामध्ये शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने मतदानावर बहिष्कार टाकत वॉकआउट केले. त्यामुळे शाहबाज यांना निवडून येण्यात कोणतीही अडचण आली नाही.


संबंधित बातमी: 


Pakistan New Prime Minister: राजीनामा देत 'इम्रान खान' यांनी पाकिस्तानी संसदेतून केलं वॉकआउट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha