एक्स्प्लोर
...म्हणून 70 वर्षाच्या आजोबांनी बँक लुटली!
न्यूयॉर्क: पती पत्नीचं नातं खरं तर नाजूक असतं. अनेकदा या नात्यामध्ये कडवटपणाही येतो. पण याच कडवटपणामुळं काही जणं अगदीच टोकाचं पाऊल उचलतात. अमेरिकेतील शिकागोमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला वैतागून थेट जेलमध्ये जाणंच पसंत केलं.
होय, 70 वर्षीय लॉरेन्स जॉन रिप्पल आपल्या पत्नीला वैतागल्यानं थेट बँक लुटण्याचाच चंग बांधला. त्यानं बँक लुटण्यासाठी पिस्तुल काढली आणि कॅशिअरसमोरच ठेवली. ब्रदरहूड बँक अॅण्ड ट्रस्टच्या शाखेमधील कॅशिअरनं बंदुकीच्या धाकानं त्याच्याजवळील पैसे त्याच्याकडे सोपवले. त्याला तीन हजार डॉलर कॅशियरनं दिले. पण त्यानंतंर एक अजबच गोष्ट समोर आली.
बँक लुटल्यानंतर रिप्पलनं पळून जाण्याऐवजी तेथील खुर्चीवर बसून घेतलं. त्यानंतर त्यानं तेथील सुरक्षा रक्षकाला बोलावून घेतलं आणि आपण बँक लुटल्याचं त्याला सांगितलं. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर रिप्पलनं पैसेही परत केले. त्यावेळी त्यानं पोलिसांना सांगितलं की, 'मला घरी जायचं नाही. तर मला जेलमध्ये पाठवा.'
पोलिसांनी देखील कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली. असं समजतं आहे की, रिप्पलला जेलमधून दुसरीकडे कुठेतरी रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत कोणतीच चर्चा केलेली नाही. पत्नीसोबत त्याचा काय वाद झाला होता याबाबत त्यांनी मौन पाळलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement