एक्स्प्लोर
रशियाच्या विमानाचा सीरियात अपघात, 32 जणांचा मृत्यू
या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली.
मॉस्को : रशियाच्या एका प्रवासी विमानाचा मंगळवारी सीरियाच्या विमानतळावर लँड होत असताना अपघात झाला. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली.
सीरियाच्या खमीमिन विमानतळावर विमान लँड होत असताना हा अपघात झाला. या विमानात 26 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर होते. विशेष म्हणजे, या विमानतळाला यापूर्वीच एअर स्ट्राईक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
हा अपघात विमानात तांत्रिक अडचणींमुळे झाल्याचा अंदाज रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने वर्तवला आहे.
सीरियाचे राष्ट्रप्रमुख बशर अल असद यांनी रशियन सैन्याच्या मदतीने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. यासाठी सीरियाच्या हद्दीत करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमुळे अनेक निष्पापांचा बळी गेला होता.
दरम्यान, यापूर्वी याच वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सारातोव एअरलाईन्सचे एंतोनोव AAN-148 विमान ओर्स्कसाठी जात होतं. पण काही काळातच ते रडारवरुन गायब झालं. यानंतर रामेंस्की जिल्ह्यात हे विमान क्रॅश झाल्याचं समोर आलं. यात जवळपास 71 जणांचा मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement