Russia-Ukraine War LIVE : युक्रेनसोबत चर्चेला रशियाची तयारी; रशिया-युक्रेन युद्धाचे सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Russia-Ukraine War LIVE : रशियाकडून अखेरीस युद्धाची घोषणा, पुतीन यांच्या आदेशानंतर युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ले, रशियाच्या आक्रमक पवित्र्याने जग धास्तावलं

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Feb 2022 07:29 AM
भारतीय नागरिकांना घेऊन विमान आज 4 वाजता मुंबईत दाखल होणार, महापौर किशोरी किशोर पेडणेकर स्वागत करणार

युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे निर्वासन विमान दुपारी ४ वाजता मुंबईत दाखल होत आहे. आज महापौर किशोरी किशोर पेडणेकर हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरितांचे स्वागत करतील.

Palghar News Updates : पालघरमधील 12 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, सर्व एमबीबीएसचे विद्यार्थी, जिल्हा प्रशासनाची माहिती

Palghar News Updates :  पालघरमधील 12 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले. सर्व एमबीबीएसचे विद्यार्थी. जिल्हा प्रशासनाची माहिती. वाडा , पालघर , वसई , विक्रमगड तालुक्यातील विद्यार्थी. सर्व विद्यार्थी कुटुंबाच्या संपर्कात . मात्र भीतीच्या वातावरणात असल्याची विद्यार्थ्यांच्या पालकांची माहिती

Nanded News Updates : नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची माहिती
Nanded News Updates :  नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलीय. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिलीय.दरम्यान रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये व्यवसाया निमित्त गेलेल्या व अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात नातेवाईक,पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे. 

दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणारा MBBS तृतीय वर्षात शिकणारा रामदेव परतानी हा 22 वर्षीय युवक सध्या युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे. रामदेव हा युक्रेनच्या किव्ह शहरात सध्या वास्तव्यास आहे. 

 

 
युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान दुपारी 4  वाजता मुंबईत येणार

युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान दुपारी 4  वाजता मुंबईत दाखल होत आहे. आज केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करतील.





रायगड जिह्यातील सुमारे 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

रायगड जिह्यातील सुमारे 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. कर्जत, नागोठणे, खोपोली, महाड, माणगाव, पनवेल, खालापूर,पेण, तळा, अलिबाग येथील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, किव्हमधील भारतीय दूतावासाकडून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सूचना

भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमा चौकीवर जाऊ नये, किव्हमधील भारतीय दूतावासाकडून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सूचना 


Russia-Ukraine War : मोठी बातमी! युक्रेनसोबत चर्चेला रशियाची तयारी; चर्चा कधी आणि कुठं?

Russia-Ukraine War : मोठी बातमी! युक्रेनसोबत चर्चेला रशियाची तयारी; चर्चा कधी आणि कुठं?


https://marathi.abplive.com/news/world/russia-ukraine-discussing-time-and-place-for-peace-talks-russia-ukraine-war-1036352 

रशियासोबत लढण्यासाठी आम्हाला एकटं सोडलं : युक्रेन

रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी यांनी म्हटले. झेलन्सकी यांनी देशाला संबोधित करणारा एक व्हिडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत रशियाच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती दिली. 

जागतिक बँक युक्रेनला आर्थिक मदत करणार

युक्रेनमधील सध्याची परिस्थिती आणि लष्करी संकट पाहता आम्ही युक्रेनला आर्थिक मदत करण्यास तयार आहोत, असे जागतिक बँकेने गेल्या गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

युद्धाच्या पहिल्याच दिवशी युक्रेनमध्ये 137 जणांच्या मृत्यू

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 316 लोक जखमी झाले आहेत.

Russia Ukraine War : बेळगाव जिल्ह्यातील दोन विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकल्या
Russia Ukraine War :  रशिया आणि युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या दोन विद्यार्थिनी तेथे अडकून पडल्या असून त्यांना सुरक्षित आणण्यात येईल अशी माहिती बेळगावचे पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी दिली. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे युक्रेनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे . युक्रेनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन आणि विजापूर जिल्ह्यातील एक विद्यार्थी अडकून पडले आहेत.युद्धामुळे कर्नाटकातून युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे अडकून पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना युक्रेन मधून सुरक्षित आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.जिल्हाधिकाऱ्यांना देखील या बाबत सूचना करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या पालकांशी देखील संपर्क साधण्यात आला असून विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणण्यात येईल असे आश्वासन देखील पालकांना देण्यात  आले असून विद्यार्थी युक्रेनमध्ये सुरक्षित असल्याचे पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी सांगितले.   
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकले असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

Russia Ukraine War : पुणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 


नवी दिल्ली येथील मदत कक्ष 
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797
दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in 


पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक 


जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दूरध्वनी 020-26123371
ई मेल controlroompune@gmail.com

Russia Ukraine War : अहमदनगर जिल्ह्यातील 18 विद्यार्थी युक्रेन अडकले

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत... त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे...अहमदनगरच्या एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत...यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत...हे सर्व विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी पालकांना दिली आहे, मात्र युध्द जन्य परिस्थितीमुळे त्यांच्याजवळील पैसे संपत असल्याने केंद्र सरकारने तातडीने आम्हाला मायदेशी परत घेऊन जाण्याची विनंती विद्यार्थी करत आहेत...

रशियाच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू?

रशियन हल्ल्यात युक्रेनमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, रशियन हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला असून 9 लोक जखमी झाले आहेत.

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनागोंदी

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लोक शहरातून पळ काढत आहेत. अचानक रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत रस्ते ठप्प झाले आहेत.


 





Russia Ukraine War : ...तर, रशियावर 30 देश एकत्रितपणे हल्ला करणार?

Russian Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर नाटो देशांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. नाटोचे सदस्य असलेल्या 30 देशांकडून रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. 

युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले

युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक लोक युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.

Ukraine : युक्रेनने रशियाचं विमान पाडलं

Russia Ukraine War : एअर स्ट्राइक करणाऱ्या रशियन हवाई दलाचे विमान युक्रेनच्या सैन्याने पाडलं असल्याची माहिती युक्रेन संरक्षण खात्याने दिली.

Russia Ukraine Conflict : रशियाने निवासी भागांवरील हल्ल्याचे आरोप फेटाळले

युक्रेनची राजधानी कीवसह विविध भागांमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमधील निवासी भागांना कोणताही धोका नसल्याचे म्हटले. 

Russia Ukraine Conflict : रशियाचे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश, भारताने संयुक्त राष्ट्रात शांततेचे आवाहन केले

Russia Ukraine Conflict : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) सध्या युक्रेन संकटाबाबत युक्रेनवर आपत्कालीन सत्र आयोजित करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, हा तणाव कमी करण्यासाठी सर्व संबंधित आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, त्यामुळे आम्ही एका दिशेने वाटचाल केली आहे. जिथे आम्हाला जायचे नव्हते.

Russia Ukraine War : युद्धाला सुरुवात! रशियाकडून अखेरीस युद्धाची घोषणा, पुतीन यांच्या आदेशानंतर युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ले

Russia Ukraine War : गेले काही दिवसांपासून ज्याची भीती होती. त्या युद्धाला सुरुवात झालेय. रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केलेय. युक्रेनच्या डॉनबास प्रांतात स्पेशल ऑपरेशन करण्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आदेश दिले आहेत. आणि या आदेशानंतर युक्रेनमधील अनेक शहरात मोठे बॉम्बहल्ले झाले आहेत. राधानी कीवमध्येही मोठे बॉम्बहल्ले झाल्यानचं कळतंय.  रशियानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानं मात्र जग धास्तावलंय. युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेय. युक्रेनमधील सर्व विमानतळही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.  सध्या युरोपातील ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स या देशांसह अमेरकेनंही युक्रेनला पाठिंबा दिलाय. जसंच जगभरातून रशियावर निर्बंधही घालण्यात आलेयत मात्र या कशालाही न जुमानता रशियानं युद्धाचं रणशिंग फुंकलंय

पार्श्वभूमी

Russia Ukraine Crisis : रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. एएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.


रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे. 


युक्रेनमध्ये आणीबाणी


युक्रेनमध्ये बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचं सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने बुधवारी (23 फेब्रुवारी) युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने (Ukraine security council) हा निर्णय घेतला आहे.  


ही आणीबाणी संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. केवळ रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्कच्या पूर्वेकडील प्रदेश वगळला आहे, याठिकाणी 2014 पासून आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. ही आणीबाणीची स्थिती 30 दिवसांपर्यंत लागू असणार असून यामध्ये देशभरात सुरक्षायंत्रणा अधिक कडक करत वाहन तपासणी तसंच इत्यादी गोष्टी वाढवण्यात येतील. तसंच परिषदेच्या या मागणीला लागू होण्यापूर्वू संसदेची मंजुरी आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी ही माहिती दिली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.