Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात तापमान शुन्याखाली गेले आहे. तर दुसरीकडे तमिळनाडू समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसात तापमानात चढउतार होत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान घसरले होते. मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झाली होती. विदर्भातही किमान तापमान 10 अंशांपर्यंत गेले हेाते. येत्या पाच दिवसात राज्यात थंडीची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आलाय. (IMD forecast)
हवामान विभागाचा इशारा काय?
येत्या 3-4 दिवसांत राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहेत. तर दुसरीकडे तापमानात होणाऱ्या वाढीमुळे सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना नागरिक करताहेत. येत्या दोन दिवसात थंडीत काहीशी वाढ होणार असून त्यांनंतर हळूहळू तापमान वाढण्यास सुरुवात होणार आहे. विदर्भात येत्या 48 तासांत फारसा बदल राहणार नसून त्यांनंतर विदर्भातही तापमान 2-3 अंशांनी वाढणार आहे. (Weather Update)
कमाल तापमानात वाढ
राज्यात केलं काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे किमान तापमान घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी कमाल तापमान वाढल्याने पहाटे गारठा, धुकं तर दुपारी उन्हाचा चटका नागरिकांना सहन करावा लागतोय .भारतीय हवामान केंद्राने केलेल्या नोंदींनुसार, गेल्या 24 तासात विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातलं किमान तापमान एक ते तीन अंशांनी घटलं होतं . मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत दोन ते तीन अंश अधिक तापमानाची नोंद झाली .कोकणात ही कमाल तापमान वाढलेलं होतं .
आज तापमानाचा पारा किती?
छ. संभाजीनगर 13 अंश
जळगाव- 12.8
कोल्हापूर- 17.8
मुंबई कोलाबा- 21.4
सांताक्रूझ- 18.1
नाशिक- 11.9
परभणी- 12.6
रत्नागिरी 20.2
सातारा- 14.4
येत्या पाच दिवसात काय अंदाज?
राज्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहणार असल्याने नागरिकांना थंडीची तीव्रता अधिक जाणवेल. गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान किंचित वाढल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत होता. आता मात्र तापमान घटल्यामुळे पुन्हा सकाळी गारवा काही भागात दाट धुकं पडणार आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी गरम कपड्यांचा वापर करत आवश्यक ती काळजी घ्यावी, असं हवामान तज्ज्ञांनी सुचवलं आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात पुढील 3-4 दिवसांमध्ये फारसा बदल होणार नाही. मात्र, किमान तापमानात येत्या तीन दिवसांत 3 ते 4 अंशांनी घट होईल, त्यानंतर तापमान पुन्हा हळूहळू वाढेल.
हेही वाचा: