लंडन: ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. रशियाचे व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांचा गंभीर आजाराने या आधीच मृत्यू झाला असून त्या ठिकाणी त्यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती काम करते असा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने 'द डेली स्टार'च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांहून जास्त काळ युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्बेत बिघडल्याचं सांगितलं जातंय. त्यातच पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो असा दावा हा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे.
हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार
पुतीन यांचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर आली तर एकच खळबळ उडण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळेच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात असल्याचा दावा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे. याबाबत ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने 'द डेली स्टार'च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
पुतीन यांना ब्लड कॅन्सर, त्यासाठी शस्त्रक्रिया केली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कॅन्सर असल्याचं मध्यंतरी सांगितलं जात होतं. त्यावरील उपचारासाठी ऐन युद्धाच्या काळात पुतीन हे सुट्टीवर जाणार होते. पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पुतीन त्यांच्या अनुपस्थितीत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि एफएसबी या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख निको
महत्त्वाच्या बातम्या :