Vladimir Putin on Ukraine : एकीकडे युक्रेन आणि रशियामधील संघर्ष सुरु असताना दुसरीकडे रशियामध्ये विजय दिवस साजरा केला जात आहे. दुसऱ्या महायुद्धात आजच्याच दिवशी रशियाने हिटलरच्या नाझी हल्ल्यातून जर्मनीवर विजय मिळवला होता. आज रशियामध्ये 77 वा विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विजय दिनाच्या संचलनाला सुरुवात झाली आहे. आज महत्त्वाच्या दिवशी पुतिन मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


विजय दिनानिमित्तच्या कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जनसंबोधन केलं. यावेळी पुतिन यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की, 'नाटोला सीमेवर रशियासाठी धोका निर्माण करायचा होता. एवढेच नाही तर युक्रेनने अण्वस्त्र हल्ल्यावरही चर्चा सुरू केली होती.' पुतिन पुढे म्हणाले, जगात पुन्हा युद्ध होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे.' यावेळी पुतिन यांनी युक्रेनमधील युद्धाची तुलना सोव्हिएत युनियनमधील दुसऱ्या महायुद्धाशी केली आहे.'


'रशियन सैन्य युक्रेनमध्ये आपल्या मातृभूमीचे रक्षण करेल'
पुतीन म्हणाले की, रशियन सैन्य युक्रेनमध्ये आपल्या मातृभूमीचे रक्षण करत आहे. ते म्हणाले की, 'रशियाला युक्रेनमध्ये धोका आहे. हिटलरप्रमाणेच रशिया युक्रेनचाही पराभव करेल. या भव्य परेडच्या माध्यमातून रशियाच्या स्वत:च्या शक्तीचे प्रदर्शन करून  जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


रशियामध्ये दरवर्षी विजय दिन परेड आयोजित करण्यात येते. मात्र, युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची परेड खास मानली जात आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आता तिसऱ्या महिन्यात पोहोचले आहे. पाश्चात्य देशांच्या शस्त्रांच्या आधारे युक्रेनचे सैन्य रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे, युद्धात प्रचंड नुकसान होऊनही पुतिन हार मानायला तयार नाहीत. संपूर्ण पूर्व युक्रेनवर कब्जा करण्याचा रशियाचा मानस आहे.


महत्त्वाच्या बातम्या :