Russia Warned Finland And Sweden : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. याचदरम्यान रशिया आणि फिनलँडमधील मतभेद अधिक गडद झाले आहेत. रशियाने फिनलँडनं आणि स्वीडनला नाटोमध्ये सामील होण्याच्या निर्णयाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. 


फिनलँडनं आणि स्वीडनने नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही देश नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करणार आहेत. याप्रकरणी रशियाने दोन्ही देशांना इशारा दिला आहे. ही आणखी एक चूक असून त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे रशियाने म्हटले आहे.


फिनलँडनं आणि स्वीडन यांनी नाटो लष्करी आघाडीत सामील होण्याचा घेतलेला निर्णय गंभीर चूक आहे. या निर्णयाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियाने दिला आहे. रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही आणखी एक गंभीर चूक असून त्याचे दूरगामी परिणाम होतील.  


रशियाचे उप परराष्ट्र मंत्री रियाबकोव्ह म्हणाले की, या कारवाईमुळे दोन्ही देशांची सुरक्षा मजबूत होणार नाही आणि मॉस्को उपाययोजना करेल. आम्ही हे प्रकरण सोडू, असा भ्रम या दोन्ही देशांनी ठेवू नये. फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टो यांनी शनिवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी नाटो सदस्यत्वासाठी देशाच्या अर्जाबद्दल चर्चा केली होती. 
 
फिनलँडनं आणि रशियामध्ये सुमारे 1340 किमीची सीमा आहे. त्यामुळे भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. दुसऱ्या महायुद्धात फिनलंडने रशियाविरुद्ध युद्ध केले. स्वीडनने गेल्या 200 वर्षांत कोणत्याही युद्धात भाग घेतलेला नाही. स्वीडनचे परराष्ट्र धोरण लोकशाहीचे समर्थन आणि आण्विक नि:शस्त्रीकरणावर केंद्रित असल्याचे मानले जाते. 


 दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून जगभरातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. तरी देखील रशिया कोणत्याही परिस्थिती माघार घ्यायला तयार नाही. फास्टफूडमध्ये लोकप्रिय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्डने  रशियामधील सर्व रेस्टॉरंट्स विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 30 वर्षांहून अधिक काळानंतर देशातून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला असून याला  युक्रेनवरील आक्रमणाची किनार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.