Ukrainian President Volodymyr Zelensky : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला  (Russia Ukraine War) समुारे तीन महिने झाले आहेत. मात्र अद्याप या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरुच आहे. जगभरातील देशांकडून हे युद्ध संपवण्यासाठी प्रयतिन सुरु आहेत. आता युद्ध संपवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelensky) यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, जर पुतिन चर्चेसाठी तयार असतील तर युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्यास युक्रेनही तयार आहे. युद्ध संपावे अशी सर्वांची इच्छा आहे. 


झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, रशियाकडून युक्रेनवर आक्रमक हल्ले सुरुच असताना रशियासोबत चर्चा करण्याची इच्छा नाही. पण युक्रेनमधील नागरिकांना सामान्यपणे जीवन जगता येण्यासाठी चर्चा हाच एक मार्ग आहे. युद्ध संपावं अशीच सर्वांची इच्छा आहे. झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासोबत बैठक करण्याची तयारी दर्शवली आहे. 


झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, ही बैठक आपला देश टिकण्यासाठी आणि युद्ध संपण्यासाठी गरजेची आहे. यामुळे युक्रेनचे नागरिक देशात परतू शकतील. तसेच यामुळे जगात शांतता टिकून राहील. याआधी बुधवारी झेलेन्स्की यांनी सांगितले होते की आता ते फक्त थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीच चर्चा करणार आहेत आणि इतर कोणाच्याही माध्यमातून चर्चेस तयार नाहीत.


युरोपियन संघाची टीका
झेलेन्स्की यांनी युरोपीय संघावर टीका केली आहे. रशियाविरूद्ध अधिक निर्बंध लादण्यावर युरोपियन संघामध्ये मतभेद आहेत. याबाबत झेलेन्स्की यांनी तक्रार केली आहे. युरोपिय संघ रशियन तेल आयातीवरील निर्बंधांसह दंडात्मक उपायांच्या सहाव्या फेरीवर चर्चा करत आहे. या हालचालीसाठी एकमत होणं आवश्यक आहे, परंतु हंगेरीला याला विरोध आहे. कारण यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेचे खूप नुकसान होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या