Russia-Ukraine War : युक्रेन (Ukraine) हे युद्धभूमी बनले आहे, यामुळे लोकांच्या जीवाचा धोका आहे. सगळीकडे विध्वंसांचे दृश्य दिसतंय, यामुळेच स्वत:ला वाचवण्यासाठी युक्रेन सोडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याबाबत संयुक्त राष्ट्राने आता एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये आतापर्यंत सुमारे 836000 लोकांनी देश सोडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सीमेवर लांबच लांब रांगा लागल्या
याआधी मंगळवारी, संयुक्त राष्ट्रचे फिलिपो ग्रँडी यांनी इशारा दिला होता की, जर रशियाचे लष्करी हल्ले सुरू राहिले तर युक्रेनमधील असुरक्षित लोकांची घरे सोडून पळून जाणाऱ्यांची संख्या वाढतच जाईल. ग्रँडी यांनी मंगळवारी जिनिव्हा येथे पत्रकारांना सांगितले की, लोक युक्रेनमधून शेजारच्या देशांमध्ये पळून गेले आहेत, त्यापैकी जवळपास निम्मे नागरिक सध्या पोलंडमध्ये आहेत. ते म्हणाले की, सीमेवर लांबच लांब रांगा लागल्या असून काही लोक त्याला ओलांडण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.
देश सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढण्याची भीती
ग्रँडी म्हणाले, "लष्करी आक्रमण चालू राहिल्यास आणि शहरी भाग एकामागून एक प्रभावित होत राहिल्यास, देश सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे," ग्रँडी यांनी असेही म्हटले की हे सरकारी धोरणांमुळे झाले नाही. यूएन मानवतावादी समन्वयक मार्टिन ग्रिफिथ्स म्हणाले की, बॉम्बहल्ल्यामुळे आधीच पाणीपुरवठा लाईन्स, पॉवर लाइन आणि मूलभूत सेवांचे नुकसान झाले आहे. ते म्हणाले की, शेकडो कुटुंबे पाण्याविनाच राहत आहेत.
आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चंदन जिंदाल असं या 22 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा पंजाबमधील बर्नाला या ठिकाणचा आहे. इस्केमिक स्ट्रोकच्या (Ischemic stroke) आजारामुळे चंदन जिंदालवर विनिस्टीयामधील इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. युक्रेनमधील खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कर्नाटकमधील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचे मंगळवारी निधन झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचे निधन झाल्याने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
संबंधित बातम्या:
- Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
- Crude Price Rise: कच्च्या तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिका देणार तीन कोटी बॅरल कच्चे तेल, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा