Russia-Ukraine War : रशियावर (Russia) आर्थिक निर्बंधांचा परिणाम तात्काळ होत नाही, कारण रशियाने गेल्या काही वर्षांमधे स्वतःसाठी वेगळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठे (international market) निर्माण केलीय. रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा परिणाम होईल पण त्यामुळे युद्ध थांबताना दिसत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सामाजिक शास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारण विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरेंनी एबीपी माझासोबत चर्चा करताना रशियामधील आर्थिक निर्बंधांचा परिणाम याबाबत सांगितले.
जगाची विभागणी पुन्हा दोन गटांमधे होतेय
डॉ. विजय खरेंनी सांगितले, रशियाचे हे आक्रमण करण्याची स्वतःची अशी कारणं आहेत. जी रशियाच्या लष्करी सामर्थ्यात, इतिहासात आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीनच्या स्वभावात दडली आहेत. या लढ्यामुळे ग्लोबल ऑर्डर बदलणार आहे. यानंतर रशिया चीन तैवानवर आक्रमण करु शकतो. त्याचबरोबर भारत पाक व्याप्त काश्मीरसाठी रशिया प्रयत्न करु शकतो. जगाची विभागणी पुन्हा दोन गटांमधे होतेय. आफ्रिकन देश, इराण, काही मध्य पूर्वेतील देश रशियाच्या बाजूने आहेत.भारताने या कालावधीत तटस्थ भुमिका घेतली पण त्यामधे प्रोॲक्टीव्हनेस असायला हवा. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट भूमिका घ्यायला मर्यादा असतात. आपली मिलीट्री इक्विपमेंट्स रशियावर अवलंबून आहेत तर दुसरीकडे लोकशाही देशावर झालेला हल्ला. यामध्ये संतुलन राखताना भारताला संतुलित भूमिका घ्यावी लागेल.
युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटू लागलेत
सध्या जगभरात एकाच विषयावर चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे, युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध. या युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. एकीकडे तेलाची किंमत वाधारली आहे. तर दुसरीकडे भरतासह अनेक देशांमध्ये शेअर मार्केट चांगलच गडगडलं आहे. आताच्या परिस्थितीबाबत बोलायचं झालं तर रशियन आर्मीनं युक्रेनच्या खारकिव्ह हा दुसऱ्या मोठ्या शहरात प्रवेश केला आहे. तर युक्रेनची राजधानी किव्हकवर रशियाचं (Russia) सैन्य मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. सॅटेलाईट फोटोवरुन दावा करण्यात आला आहे की, रशियन सैन्य किव्हवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे या युद्धात Nucelar शस्त्रांचा वापर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- SWIFT : रशियाच्या आर्थिक नाड्या आवळणारा SWIFT निर्बंध आहे तरी काय?
- Russia-Ukraine War : पृथ्वीवर हाहाःकार, क्षणार्धातच कोट्यवधी मृत्यू; अणू युद्ध झाल्यास काय होईल? तज्ज्ञांची धडकी भरवणारी माहिती
- Russia-Ukraine War : किव्ह संकटात, उपग्रहानं टिपला 'पुरावा'; रशियाची अजस्त्र फौज मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha