Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांवर जोरदार गोळीबार करत आहेत. यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हे युद्ध आता अणुयुद्धाच्या दिनेने चालले आहे काय? अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रशियाकडून गुरूवारी युक्रेनवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर आजही चौथ्या दिवशी दोन्ही देशांमधील हे युद्ध सुरूच आहे. जगभरातून रशियावर टीका सुरू झाल्यानंतर नाटो देशांनीही रशियाला इशारा दिला आहे. नाटो देशांच्या इशाऱ्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याच्या सूचना देत नाटोला अणुयुद्धाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, युक्रेननं बेलारुसमध्ये चर्चा करण्यासाठी होकार दिल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थांनी दिली आहे. बेलारुसमध्ये चर्चा करण्यासाठी प्रथम युक्रेनने नकार दिला होता. परंतु, सध्या युक्रेनचं शिष्टमंडळ बेलारुसला पोहोचल्याचं रशियानं म्हटलंय. तर युक्रेनमधील सर्वात मोठं शहर असलेल्या खारकीवमधून रशियन सैन्याला बाहेर काढण्यात युक्रेनी फौजा यशस्वी झाल्याचा दावा युक्रेननं केला आहे.
रशियाच्या आक्रमणाविरोधात युक्रेन आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेला आहे. युक्रेनमध्ये नरसंहार केल्याबद्दल रशियाला जबाबदार धरलं पाहिजे. याबरोबरच रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश दिला पाहिजे, अशी विनंती युक्रेननं आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे केली आहे.
रशियाचे मोठे नुकसान केल्याचा युक्रेनचा दावा
दोन्ही देशांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू असतानाच रशियाचे मोठे नुकसान केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे 26 हेलिकॉप्टर्स, 146 रणगाडे आणि 38 गाड्या उद्धवस्त केल्या असून चार हजार पेक्षा जास्त रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. याबरोबरच जगभरातील 84 देश आमच्यासोबत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia vs Ukraine War : पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेनच्या अध्यक्षांचा फोन, म्हणाले.....
- Russia Ukraine War : युक्रेनमधून पोलंडमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सीमेवर धक्काबुक्की, पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप
- Russia Ukraine War : युद्धाच्या चौथ्या दिवशीही युक्रेनवर हल्ला सुरूच, दोन मोठ्या शहरांना घेरल्याचा रशियाचा दावा
- North Korea : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी, दक्षिण कोरियाकडून पुष्टी