Russia Ukraine War : चौथ्या दिवशीही युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरुच आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिण आणि आग्नेय भागातील दोन शहरांना वेढा घातल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी रशियाने मोठी घोषणा करत आता युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले जातील, असे म्हटले आहे. रशियाने सांगितले आहे की, आता रशिया युक्रेनवर चारही बाजूंनी हल्ला करणार आहे. त्यांनी यापूर्वी कीव्हवरील कमी हल्ले केल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर पाश्चात्य देशांकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळाल्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह युक्रेनमधील सर्व शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत.
रशियन सैन्याचा चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा
शनिवारी चेर्नोबिल अणु प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर आता रशियन लष्कर आणखी एक अणु प्रकल्प ताब्यात घेण्याचा प्रयत्नात आहे. रशियन सैनिकांकडून बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जात आहेत.
खार्किवमध्ये गॅस पाइपलाइन उडवली
दरम्यान, रशियन सैन्याने खार्किवमध्ये गॅस पाइपलाइन उडवली. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सांगितले की, रशियाच्या सैन्याने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवमध्ये गॅस पाइपलाइन बॉम्बचा स्फोट केला. स्पेशल कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन प्रोटेक्शनच्या राज्य सेवेने चेतावणी दिली की स्फोटामुळे पर्यावरणीय आपत्ती उद्भवू शकते आणि रहिवाशांना घरांच्या खिडक्या ओल्या कपड्यांनी झाकण्याच आणि भरपूर द्रव पिण्याचा सल्ला दिला.
बॉम्बस्फोटात 10 ग्रीक नागरिक ठार
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेन उद्ध्वस्त झाले आहे. दरम्यान, रशियाने केलेल्या हल्ल्यात दहा ग्रीक नागरिकांचाही मृत्यू झाला होता. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या मारियुपोल शहराजवळ रशियन बॉम्बहल्ल्यात 10 ग्रीक नागरिक ठार झाले आहेत आणि 6 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : बॉम्बस्फोट आणि तोफांच्या आवाजातच चिमुकलीचा जन्म, युक्रेन सरकारनं नाव ठेवलं 'स्वातंत्र्य'
- Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेले 250 विद्यार्थी दिल्ली विमानतळावर पोहोचले, एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल
- Russia Ukraine Conflict : अमेरिकेचा रशियाला मोठा झटका, इंटेलकडून मायक्रोचिपचा पुरवठा बंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha