Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अतिशय बिटक झाली आहे. त्यातच भारतातील अनेक नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. काल एक आणि आज एका विमानाने युक्रेमधील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. परंतु, अजूनही अनेक नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. काही विद्यार्थी युक्रेनमधून पोलंडला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, युक्रेनवरून पोलंडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलंड सीमेवर पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


युक्रेनियन सैनिक आणि पोलीस पोलंडच्या सीमेवरून हवेत गोळीबार करत आहेत. शिवाय त्यांच्या कार जमावामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलंड सिमेवरून या विद्यार्थ्यांना परत युक्रेनमध्ये नेण्याचा प्रयत्न होत असून काही विद्यार्थ्यांना मारहाणनही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.  






युक्रेनमधून निधालेल्या एका मल्याळी विद्यार्थीनीने तिला आणि तिच्या मित्राला युक्रेन पोलिसांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. एंजल असे या विद्यार्थीनीचे नाव असून, ती सांगते की, युक्रेनचे पोलीस आपली वाहने विद्यार्थ्यांच्या समुहामध्ये घुसवत आहेत. यावेळी अनेक विद्यार्थी जमीनीवर पडले. परंतु, पोलिसांना याची पर्वा नाही. युक्रेन सैन्याने परदेशी नागरिकांसोबत असे वागणे बरोबर नाही.  



 
युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना बंकरमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आहे. परंतु, बंकरमधील लोकांना जेवणही मिळत नाही. केरळमधील 21 वर्षीय शाना शाजी हिने पीटीआयसोबत बोलताना सांगितले की, आम्ही येथील मेट्रो बंकरमध्ये लपलो आहोत. परंतु, आमच्याकडे फक्त एक दिवसाचे अन्न शिल्लक होते. रशियाने हल्ला केल्यानंतर शाजी तिच्या मित्रांसोबत गुरुवारी मेट्रो स्टेशनवर गेली होती. परंतु, त्यावेळी स्टेशनच्या बाहेर काय चालले आहे? याची त्यांना कल्पना नव्हती. काही वेळात परिस्थिती सुरळीत होईल, असा विचार करून त्यांनी मेट्रो स्थानकातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु, रस्त्यावर लष्करी वाहने दिसल्यानंतर ते परत मेट्रोच्या बंकरमध्ये आले. गुरूवारपासून आजपर्यंत बंकरमध्येच असल्याचे शाना शाजीने सांगितले.  


"आमच्याकडे अन्नधान्याचा पुरवठा नाही. आता आम्ही काय करणार? एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. मेट्रो स्टेशनमधील बहुसंख्य लोक भारतीय नागरिक आहेत. ते प्लॅटफॉर्मवर झोपत आहेत आणि तात्पुरते बेड तयार करण्यासाठी गाद्या आणि ब्लँकेटचा वापर करत आहेत. शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही शिफ्टनुसार झोप घेत आहोत.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :