North Korea Missile Test : युक्रेन - रशिया युद्धात अमेरिका आणि त्याचे मित्र देश व्यस्त असताना उत्तर कोरियाने (North Korea) महिनाभरानंतर रविवारी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी (Ballistic Missile Test) केली आहे. त्यांनी समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाने या दाव्याची पुष्टी केली आहे.


उत्तर कोरियाची नव्या वर्षातील आठवी चाचणी
उत्तर कोरियाची ही नव्या वर्षातील आठवी क्षेपणास्त्र चाचणी आहे. याआधी 30 जानेवारीला चाचणी करण्यात आली होती. त्याच्या जवळपास महिन्याभरानंतर पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की उत्तर कोरिया आपले शस्त्रास्त्र तंत्रज्ञान सुधारण्यावर भर देत असून याद्वारे अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.


उत्तर कोरियाचा अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न
अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी उत्तर कोरिया युक्रेन-रशिया संघर्षात अमेरिकेच्या सहभागाचा वापर करून चाचण्या वाढवू शकतो, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी सांगितले की, उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पूर्व किनारपट्टी आणि जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर पडण्यापूर्वी त्याने सुमारे 600 किलोमीटर उंचीवर सुमारे 300 किलोमीटरपर्यंत उड्डाण केले होते.


दक्षिण कोरियाने व्यक्त केली तीव्र चिंता
चाचणीमुळे जहाजे किंवा विमानांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. दक्षिण कोरियाच्या अधिकार्‍यांनी उत्तर कोरियाच्या राजधानीच्या भागातून क्षेपणास्त्र चाचणी झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.


दक्षिण कोरियाने बोलावली तातडीची बैठक
नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या आपत्कालीन बैठकीदरम्यान, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणादरम्यान दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी चाचणीला जगातील शांतता आणि स्थैर्यासाठी घातक असल्याचं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha