Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम भारतापर्यंत पोहोचला असून भारतातील स्टील उत्पादनावर याचा परिणाम झाल्याचं दिसून येतआहे. बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या स्टीलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे बांधकामाचा खर्च देखील वाढणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता जशी वाढत आहे, तसतसे बांधकामासाठी लागणारे स्टीलचे दर देखील वाढायला लागले आहेत. चार दिवसापूर्वी 55,000 रुपये प्रति टन असलेले स्टील आता 69 हजार ते 70 हजार प्रतिटन इथवर पोहोचले आहे. म्हणजे अवघ्या काही दिवसांत हे दर वाढल्याचं दिसून येत आहे.


नेमकं कारण काय?


जगाच्या पाठीवर मॅंगनीज तसेच लोह खनिजाचा निर्यातदार म्हणून युक्रेनकडे पाहिले जाते, युरोप खंडामध्ये प्रामुख्याने याची निर्यात होते. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्याने या खनिजाचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच परिणाम म्हणून ही भाव वाढ झाली आहे. याशिवाय मागणीच्या तुलनेत देशांतर्गत कोळसा तसेच स्टीलसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींची उपलब्धता कमीच आहे, त्यामुळे यासाठी परदेशातून कच्चामाल मोठ्या प्रमाणावर आयात केला जातो. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम मालवाहतूकीवर देखील झाला असून यामुळे कच्चा मालाचा दर देखील झपाट्याने वाढु लागला आहे. मागील आठवड्यात 45000 रुपये प्रतिटन असलेला कच्चामाल आता 50 हजार रुपये प्रतिटन वर गेला आहे. त्यामुळे स्टील उत्पादकांना निर्मिती खर्च वाढला आहे, ज्यामुळे स्टीलचे दर वाढू लागले आहेत.


बांधकामावर परिणाम


जाणकारांच्या मते बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या स्टीलचे वाढणारे दर यामुळे एकूणच बांधकाम खर्चामध्ये 25 ते 30 टक्के वाढ होऊ शकते. निर्माणाधिन सरकारी कामावर देखील याचा परिणाम होऊन सरकारी तिजोरीवर देखील याचा ताण येऊ शकतो. युद्ध निर्णायक स्थिती पर्यंत यायला किती काळ लागेल हे महिती नाही? इकडे भाव वाढतच असून युद्ध थांबले तरी हे भाव लगेचच कमी होण्याची शक्यता तशी धुसूर आहे. त्यामुळे युद्धाची सांगता झाली तरी बांधकाच्या खर्चात झालेली वाढ काही काळ सहन करावी लागेलं हे नक्की! 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha