Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक युक्रनियन नागरिकांनी आपलं प्राण गमावले आहेत. अनेकांची कुटुंब आणि संसार उद्धवस्त झाले आहेत. अनेकांनी या युद्धांत आपले प्रियजन गमावले आहेत. अशाच एका नऊ वर्षाच्या मुलीने युद्धात आपली आई गमावली आहे. या मुलीने आपल्या मृत आईला लिहीलेले पत्र सध्या चर्चेत आलं आहे. तिने पत्रात मृत आईला चांगली व्यक्त बनण्याचं वचन दिलं आहे. तसेच तिने स्वर्गात आपली भेट होईल असंही म्हटलं आहे.


युक्रेनमधील बोरोदियांका येथे राहणाऱ्या गलिया या नऊ वर्षीय मुलीने रशियन हल्ल्यात तिची आई मारली गेल्यानंतर हे पत्र लिहिलं आहे. गलियानं आईला तिच्या आयुष्यातील सुंदर नऊ वर्ष दिल्यासाठी आभारही मानले आहेत. युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी या पत्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी  या ट्वीटला कॅप्शन देत सांगितलं आहे की, 'नऊ वर्षांच्या मुलीने बोरोदियांका येथे मरण पावलेल्या तिच्या आईला पत्र लिहीलं आहे.'







गलियाने आपल्या मृत आईला लिहीलेल्या पत्रात लिहीलं आहे की, 'आई! तू संपूर्ण जगातील सर्वोत्तम आई आहेस. मी तुला कधीच विसरणार नाही. स्वर्गात आनंदी राहा. मी एक चांगली व्यक्ती होण्यासाठी आणि स्वर्गात जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. आपण स्वर्गात भेटू! गलिया.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha