Russia Ukraine Conflict : आज रशिया-युक्रेन युद्धाचा 52 वा दिवस आहे. या 52 दिवसांत रशियाने युक्रेनमधील अनेक मोठी शहरे उद्ध्वस्त केली आहेत. त्यामध्ये युक्रेनची राजधानी कीव्हचाही (Kiev) समावेश आहे. रशियन सैन्याने कीव्हमध्ये गोळीबार केला. आता रशियन सैन्य माघारी परतल्यानंतर कीव्हमध्ये 900 हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. कीव्हमधील प्रादेशिक पोलीस दलाचे प्रमुख आंद्रे नेबिटोव्ह यांनी सांगितले की, सापडलेले काही मृतदेह तात्पुरते दफन करण्यात आले असून काही अद्यापही रस्त्यावर पडून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 95 टक्के नागरिकांचा मृत्यू
 टक्के गोळी लागल्याने झाल्याचे दिसून येते.


ढिगाऱ्याखाली मृतदेह
आंद्रे यांनी सांगितले की, रशियन सैन्याने या नागरिकांची हत्या केली आहे. किव्हमध्ये सापडलेल्या मृतदेहांची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. हे मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दररोज ढिगाऱ्याखाली आणि सामूहिक कबरींमध्ये मृतदेह सापडत आहेत. बुचामधील नरसंहारातही 350 हून अधिक मृतदेह सापडले आहेत.


खार्किवमध्ये 500 हून अधिक नागरिक मारले गेले
रशियाच्या आक्रमणानंतर खार्किवमध्ये 24 मुलांसह 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. खार्किव ओब्लास्टचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले की, रशियन सैनिकांकडून नागरिकांवर गोळीबार करणे सुरूच आहे. 14 एप्रिल रोजी रशियाने अनेक क्षेपणास्त्र आणि तोफांच्या साहाय्याने सुमारे 34 वेळा नागरी वस्त्यांवर हल्ले केले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha