Ukraine Russia War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 51 वा दिवस आहे. यादरम्यान रशियाने युक्रेनमधील अनेक मोठी शहरे उद्ध्वस्त केली आहेत. या युद्धात दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, युक्रेनच्या दोन क्षेपणास्त्रांनी रशियन युद्धनौका Moskva बुडाल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागॉनने केला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने पेंटागॉनच्या हवाल्याने रशियन युद्धनौका Moskva बुडवल्याची माहिती दिली आहे.


Moskva युद्धनौका बुडाल्यानंतर रशिया प्रत्युत्तर म्हणून युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र करू शकतो, असे मानले जात आहे. याच दरम्यान, गुरुवारी काळ्या समुद्रात तैनात असलेल्या खराब झालेल्या Moskva ची माहिती समोर आली होती.


रशियन सैन्याला मोठा धक्का 


असे म्हटले जात आहे की, Moskva बुडल्याने रशियन सैन्याला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनियन सैन्याच्या रशियाच्या हद्दीत कथित घुसखोरीच्या प्रत्युत्तरात राजधानी कीववर क्षेपणास्त्र हल्ले तीव्र करण्याचे सांगितले आहे.


Moskva त लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची आहे क्षमता 


Moskva युद्धनौका 16 लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम होती. युद्धनौका बुडाल्याने काळ्या समुद्रात रशियाच्या लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय या घटनेमुळे रशियाच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसला आहे. ज्याकडे मोठी ऐतिहासिक चूक म्हणून पाहिले जात आहे. अशातच युक्रेनची राजधानी कीवसह देशाच्या उत्तरेकडील भागातून माघार घेतल्यानंतर रशिया पूर्व युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत युद्धनौकेचे बुडणे हा रशियाचा मोठा प्रतिकात्मक पराभव मानला जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha