Russia Ukraine War : युक्रेनच्या सैन्याने गुरुवारी खार्किवमधील एक पूल उद्ध्वस्त करून रशियन सैन्याचा ताफा नष्ट केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने फेसबुकवर  हा दावा केला आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'युक्रेनियन सैन्याने पुलाखाली स्फोटके ठेवली होती. त्यानंतर सैन्य शत्रूची वाट पाहत होते. रशियन सैन्याचा ताफा या पुलावर पोहोचल्यावर हल्ला करत ताफा नष्ट करण्यात आला. रशियन ताफ्यामध्ये टायगर, कामझ आणि लष्करी वाहने सामील होती.' 

पूर्व युक्रेनमधील इझियम शहराजवळ हा हल्ला झाला. युक्रेनच्या सैन्याने फेसबुक पोस्टमध्ये नष्ट झालेल्या पुलाचे फोटोदेखील शेअर केले आहेत. ड्रोनच्या साहाय्याने फोटो काढण्यात आल्याचं युक्रेनियन सैन्यानं म्हटलं आहे. रशियाने या महिन्याच्या सुरुवातीला बेल्गोरोड शहरातील इंधन डेपोवर हल्ला केला. यासह अलीकडच्या आठवड्यात युक्रेनियन सैन्याने सीमावर्ती भागांवर हल्ल्यांची मालिका सुरुच ठेवली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार समित्यांच्या निवडणुकीत रशियाचा पराभवदरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या चार समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत रशियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धावरून मॉस्कोचे जागतिक पातळीवर एकाकी पडल्याचे लक्षण म्हणून याकडे पाहिले जात आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काऊन्सिल (ECOSOC) च्या सहाय्यक आणि संलग्न संस्थांमधील विविध रिक्त पदे भरण्यासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha