Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक संकटाममुळे त्रस्त झालेले लोक गुरुवारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. वाढती महागाई आणि जीवनावश्यत वस्तूंचा तुटवडा यामुळे राजधानी कोलंबोमध्ये (Colombo) लोकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. देशात सतत इंधनाचा तुटवडा असून वीज तुटवड्याचाही सामना करावा लागत असल्याचा आरोप जनतेकडून करण्यात येतोय. यासोबतच खाद्यपदार्थांचे भावही गगनाला भिडले आहेत. सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेने पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांला लक्ष करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलकांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोपही केले आहेत.


कोलंबोमध्ये सरकारविरोधात निदर्शनं
श्रीलंका भीषण आर्थिक परिस्थितीमुळे जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. कोलंबोतील रस्त्यांवर वाहनांचा लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. यामुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. कोलंबो श्रीलंकेचा मार्क्सवादी पक्ष, जनता विमुक्ती पेरामुना (JVP), पुढच्या आठवड्यात राजपक्षे सरकारच्या हकालपट्टीसाठी एक मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. जेव्हीपीचे सरचिटणीस टिल्विन सिल्वा यांनी सांगितले की, '17 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित केला जाणारा मोर्चा श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा असेल.' मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. हे भ्रष्ट सरकार मनुष्यबळाच्या माध्यमातून उलथवून टाकणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.




 


कोलंबोमध्ये महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावावर आणि सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्यानंतरचे सर्वात वाईट आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशात महागाई शिखरावर पोहोचली आहे. डिझेल आणि पेट्रोलचा मोठा तुटवडा आहे. नागरिकांना अन्नाच्या तुटवड्यासह अनेक तास वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha