Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाच्या सातव्या दिवशी रशियन सैन्यानं खारकिव्हला लक्ष्य केलं आहे. खारकिव्हमध्ये 21 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती युक्रेननं दिलीय. तर 112 जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. रशियन सैन्यानं मिसाईलसह हल्ला चढवला. खारकिव्हमध्ये रशियाच्या पथकानं लष्कराच्या इमारतीवर हल्ला केला. याशिवाय पोलीस ठाणं आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आलं. युक्रेनच्या खारकिव्ह शहरात सगळीकडे हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत. उद्ध्वस्त खारकिव्हमधली दृश्य मनाला वेदना देणारी आहेत.  याशिवाय खेरसॉन शहर रशियन फौजांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातंय.  याशिवाय खेरसॉन शहर रशियन फौजांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातं


रशियन फौजांनी खारकिव्ह मध्ये केलेल्या विध्वंसाचीही दृश्यं समोर आली आहेत. रशियाच्या क्षेपणास्त्र आणि बॉम्बहल्ल्यांमध्ये इथे रहिवाशी इमारतींचं मोठं नुकसान झालंय. बॉम्बहल्ल्यांमुळे इथले रस्तेही उद्ध्वस्त झाले आहेत. खारकिव्हमधून बहुतेक नागरिकांनी स्थलांतर सुरू केल्यानं आता खारकिव्हमधील रस्त्यांवरही स्मशानशांतता आहे.


रशियानं खारकिव्ह शहरात बॅाम्बहल्ले आणखी तीव्र केले आहेत. खारकिव्हमधलं स्थानिक पोलीस ठाणे देखील रशियाच्या सैन्यांनी उद्ध्वस्त केलंय. त्याची दृश्य माध्यमांच्या हाती लागली आहेत. रशियन लष्करानं खारकीव्ह शहराला लक्ष्य केल्यानंतर आता खारकिव्हमध्ये असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचं स्थलांतर सुरू करण्यात आलंय. खारकीव्हमधून विद्यार्थ्यांच्या झुंडी चालत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाल्या आहेत. उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून युक्रेनमध्ये शिकण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना जीवासोबत आता भवितव्याचीही चिंता आहे.


रशियात अनेक ठिकाणी युद्धविरोधी रॅली


रशियातील अनेक शहरात यूक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धाविरोधात रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागात घेत आहेत. रॅली काढल्याने रशियन पोलिसांनी कारवाई करत हजारो नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच युद्धात रशियाविरोधी बातम्या दाखवल्याने रशियन सरकारकडून टीव्ही रेन आणि इको ऑफ मॉस्कोवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील सुमारे सहा लाख साठ हजार नागरिकांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनमधील लोक युद्धाच्या काळात पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी येथे स्थलांतरित होत आहेत. हे देश युक्रेनच्या सीमेला लागून आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: