Ahmedabad Plane Crash News Live: अहमदाबाद विमान अपघाताची एटीएस करणार चौकशी , घटनास्थळावरून सापडला डीव्हीआर
Air India Plane Crash In Ahmedabad: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेचा आढावा घेणार आहेत. अपघातामधील एक जखमी प्रवासी आणि हॉस्टेलच्या जखमी डॉक्टरांशीही संवाद साधणार आहे.
पार्श्वभूमी
Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात (Air India Plane Crash In Ahmedabad) 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या...More
मुंबईच्या माहिममध्ये सिलेंडर ब्लास्टमध्ये ८ जण जखमी
माहिमच्या मकदूमबाबा दर्गाजवळील फूडस्टाॅल येथे झाला सिलेंडर ब्लास्ट
८ या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
घटनास्थळी पोलिस व अग्निशमन दलाचे जवान दाखल
आम्ही सर्व तपास पथकांना सहकार्य करत आहोत. आम्ही तपासात पूर्ण पारदर्शकता राखत आहोत. टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. शब्द आम्हाला सांत्वन देऊ शकत नाहीत असे टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन म्हणाले.
एअर इंडियाचे हे विमान अपघात का झाले? याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तथापि, सरकारने चौकशीचे आदेश जारी केले आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुःखद दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे. तथापि, एअर इंडियाच्या विमान अपघाताचे तुर्की कनेक्शन देखील समोर येत आहे. तुर्की कंपनी टर्किश टेक्निक ही जागतिक विमान वाहतूक सेवा प्रदाता आहे. भारतातील काही विमान कंपन्या देखील या कंपनीच्या क्लायंट आहेत, ज्यात एअर इंडिया आणि इंडिगो यांचा समावेश आहे. एअर इंडियाचा विचार केला तर, बोईंग ७७७ विमानांच्या ताफ्याच्या देखभालीसाठी एअरलाइन त्यांचे विमान तुर्की टेक्निककडे पाठवत असे, ज्यामध्ये मूलभूत देखभाल, पुनर्वसन आणि रेट्रोफिटचे काम समाविष्ट होते. तथापि, एअर इंडिया केवळ तुर्की कंपनीकडूनच नव्हे तर भारतातील एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) आणि इतर काही देशांकडूनही विमानांची देखभाल करत असे.
देशात खूप मोठी वाईट घटना काल घडली. देशात हा पहिलाच इतका मोठा विमान अपघात घडला असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सगळीकडे शोक व्यक्त होत आहे. अशा दुःखात बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावे. शेवटी आपण निर्णय घ्यावा. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असे बावनकुळे म्हणाले.
सरकारने बोईंग कंपनीच्या विमानासंदर्भाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून तपासणीसंदर्भातला रिपोर्ट डीजीसीएला सुपूर्द करावा लागणार आहे. डीजीसीएने एअर इंडियाला लिहिलेल्या पत्रात एअर इंडियाच्या देखभाल आणि तपासणी प्रक्रियेबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात आता एटीएसचीही एंट्री झाली आहे. तर, बोईंग विमानाच्या संदर्भातने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हणजेच डीजीसीएने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून DGCA ने एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787-8/9 विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. बोइंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून DGCA ने एअर इंडिया कंपनीच्या बोइंग 787-8/9 विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदाबादमध्ये विमान अपघातानंर विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) घटनास्थळाच्या इमारतींवर सापडला आहे. या संदर्भात संबंधित तपास यंत्रणा काम करत असून 40 हून अधिक राज्य सरकारचे तपास अधिकारी आणि विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी अपघात भागात तपास करत आहेत. ब्लॉक बॉक्स संदर्भात जे सोशल मीडियावर व्हिडीओ रेकॉर्डर व्हायरल होत आहे ते DFDR (I Digital Flight Data Recorder) नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी विमान अपघात झाला ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या बीजे मेडिकल हॉस्टेलचे मोठे नुकसान झाला आहे. हॉस्टेलच्या चारही बिल्डिंगमध्ये लागलेल्या आगीमुळे हे नुकसान झाले त्यामुळे त्या ठिकाणी राहणारे निवासी डॉक्टर्स हे सुद्धा आपलं सामान घेऊन इतरत्र शिफ्ट होताना पाहायला मिळताय... प्रशासनाने त्यांची सोय सिविल रुग्णालय त्यासोबतच विविध ठिकाणी केली आहे आणि त्यामुळे आपल्या बॅग घेऊन हे निवासी डॉक्टर्स आता या होस्टेल मधून बाहेर पडत आहेत..ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे नेमकी दुर्घटना कशी झाली त्याचं नेमकं कारण काय आहे? याचा सुद्धा तपास केला जाणार आहे... सध्या तपास यंत्रणा अजूनही घटनास्थळी असून या भागाच्या अधिक ची माहिती घेत आहेत तर दुसरीकडे निवासी डॉक्टर्स विविध ठिकाणी आपल्या बॅगा घेऊन शिफ्ट होताना पाहायला मिळतात.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्व प्रवाशांना मंत्री दादा भुसे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
अहमदाबादमीधल विमान दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह सर्व प्रवाशी मृत पावले आणि एकचं प्रवाशी वाचला. ही दुर्घटना देशासाठीचं नव्हे तर, जगाच्या पाठीवर या दुर्घटनेचा शोक व्यक्त केल्या जातोय. विमानात जे प्रवाशी होते, त्यांच्या कुटुंबाचं काय दुःख आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या दुःखात काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये, यासाठी सरकारनं दखल घेतली पाहिजे, अशा शोक संवेदना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.
Ahmedabad Plane Crash Live: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात अर्जुन पटोलिया यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आले होते. अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारती यांचे सात दिवसांपूर्वीच लंडनमध्ये निधन झाले होते.
Ahmedabad Plane Crash Live: एअर इंडिया विमान अपघातावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त किंवा सध्याचे न्यायाधीश, जे योग्य वाटतील, त्यांच्या अध्यक्षतेखाली व्हायला हवी. यात नेमकी चूक कुणाची होती, ते समोर येईल. पायलटची चूक होती का? कोणत्यातरी प्रशिक्षकाची चूक होती का? की एखाद्या दबावाखाली विमानाने उड्डाण घेतले? हे सर्व तपासले गेले पाहिजे. सरकारने चूक स्वीकारून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी."
Ahmedabad Plane Crash Live: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीचा फोटो पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या 'एक्स' (माजी ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, "विजयभाई आता आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही."
Sanat Kaul on Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे माजी सहसचिव डॉ. सनत कौल (Sanat Kaul) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ही दुर्घटना खूप भयानक आहे, ज्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले, हे खूप दुःखद आहे. मात्र हे बोलत असताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, दोन्ही इंजिन एकाच वेळी कसे निकामी होऊ शकतात?
अपघातग्रस्त बोईंग विमान फक्त 10 वर्षे जुने होते. डॉ. कौल म्हणाले की, बोईंग ही 100 वर्षे जुनी प्रतिष्ठित कंपनी आहे. परंतु अलिकडच्या काळात त्यांच्या विमान निर्मितीबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत आणि अमेरिकेतही चौकशी सुरू आहे. किंबहुना, अपघातग्रस्त बोईंग विमान फक्त दहा वर्षे जुने होते.
लंडनला ॲमेझॉन मध्ये काम करणारा मुलगा आणि सुनेचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू, फ्लाईट मध्ये बसल्याचा केला शेवटचा फोन, अपघात नंतर वडिलांना मोठा धक्का
गुजरातच्या नडियाद जिल्ह्यातील अनिल पटेल यांचा मुलगा हर्षित पटेल आणि सून पूजा पटेल हे गेल्या दोन वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास आहेत.
मुलगा ॲमेझॉन मध्ये नोकरी करत होता दरम्यान आपल्या गावी दोन वर्षानंतर आल्यानंतर हे दाम्पत्य विमानाने पुन्हा लंडनला निघाले होते.
वडिलांनी निरोप देताना फोन केला मात्र हा निरोपाचा फोन शेवटचा निरोप होता
कारण विमानात बसल्यानंतर एक वाजेच्या सुमारास त्याने वडिलांना फोन करून फ्लाईट मध्ये बसल्याचा कॉलही केला होता मात्र त्यानंतर विमानाचा अपघात झाल्याचे समजलं आणि पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला.
वडील अनिल पटेल आपल्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पहाटेपासून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत, आपला डीएनए सॅम्पलही त्यांनी दिलाय..
Ahmedabad Plane Crash Live: अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करणार आहे. या प्रकरणात, अपघातस्थळावरून एक डीव्हीआर सापडला आहे, जो एटीएसने ताब्यात घेतला आहे. गुजरात एटीएस टीम या प्रकरणात समांतर तपास करत आहे. त्याच वेळी, फॉरेन्सिक टीमने अपघातस्थळावरून नमुने गोळा केले आहेत, जे तपासणीसाठी पाठवले जातील
Ahmedabad Plane Crash Live: अहमदाबाद विमान अपघाताबाबत माजी हवाई वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. सनत कौल यांनी मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी म्हटले आहे की डीजीसीएने एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहिले होते. त्यांनी असा दावा केला की बोईंग ही १०० वर्षे जुनी कंपनी आहे, परंतु गेल्या वर्षापासून तिच्याविरुद्ध अनेक तक्रारी येत आहेत. अमेरिकेनेही चौकशी केली होती.
मुलाच्या पदवीप्रधान समारंभाला जाणाऱ्या पंड्या पती-पत्नींचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू, मुलीला सरप्राईज देण्याचं ठरवून न सांगता निघाले होते पंड्या पती-पत्नी
आपल्या मुलाला चांगले गुण मिळाले त्यानंतर पदवी प्रदान समारंभाला लंडनला निघालेल्या पंड्या पती-पत्नीचा कालच्या अहमदाबाद रेल्वे अपघातात मृत्यू झाला...
पंड्या कुटुंबातील मुलगा आणि मुलगी हे दोघेही शिक्षणासाठी लंडनला होते
आपल्या मुलीला सरप्राईज देता यावं असं ठरवून न सांगता हे पती-पत्नी लंडनला तिकीट काढून फ्लाईटने निघाले... मात्र काल दुपारी लंडनला जाणार हेच विमान कोसळलं आणि यामध्ये पंड्या पती-पत्नीचा मृत्यू झाला
आता याच दोन मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी या दोन्ही पती-पत्नीचे भाऊ-बहीण हे डीएनए टेस्टसाठी रुग्णालयात आले आहेत त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटना कशामुळे झाली? त्याची कारणे काय आहेत हे तपासणे गरजेचे. व्यवस्थेची यात जबाबदारी असेल तर ती जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. व्यवस्थेने नैतिक जबाबदारी घ्यायची असते पण, आता तशी पद्धत राहिलेली नाहीए. आता काहीही घडलं तरी आम्ही आहोतच अशीच भूमिका आहे. असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान काल (गुरुवारी, ता,13) दुपारच्या सुमारास कोसळले. त्यात 12 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. या अपघातातून (Ahmedabad Plane Crash) फक्त एक प्रवासी वाचला. मृतांमध्ये 169 भारतीय, 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. या दुर्घटनेमध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर रोशनी राजेंद्र सोनघरे हीचा देखील समावेश आहे. रोशनी सोनघरे यांच्या मृत्यूला महाराष्ट्राचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दुजोरा दिला.
Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्यू मेंबरचा ही दुरदैवी अंत झाला...इरफान हा पिंपरी चिंचवड च्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता...! आजी आजोबा आई वडील भाऊ अस कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता...! अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी ही येऊन गेला होता...! त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे... ! त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत...!
बोईंगच्या अडचणी आणि ७८७-८ विमानं कसं आहे? किती सेफ आहे ७८७-८?
संजय कर्वे, एव्हिएशन तज्ज्ञ आणि माजी मुख्य वैमानिक, महाराष्ट्र सरकार
बोईंग ७८७-८ जगातील सर्वात सेफ विमानापैकी एक विमान आहे
१ हजार १५० बोईंग ७८७ विमानं उड्डाण करतायत
हे विमान ड्राॅईंग बोर्डवर बोईंगनं तयार केलं होतं
बोईंग ७३७ मध्ये १८२ प्रवाशांपर्यंत आणलं, बोईंग ७७७ हे साधारण ३५०-४५० प्रवासी घेऊन जाणारं होतं
अशात, मधल्या गॅपसाठी विमान नव्हतं अशात आॅपरेटरकडून मागणी झाली आणि बोईंगनं ७८७ आणलं
सर्वात अत्याधुनिक असं हे विमान होतं, सेफ होतं आणि आहे
सुरुवातीला जपान एअरलाईन्स मध्ये आग लागल्याची घटना घडली होती, ज्यात ७८७ मध्ये बॅटरीचे इश्यू समोर यायला लागले
आपल्याकडे ७८७ आले तेव्हा शाॅर्ट सर्किट झाले होते
त्यानंतर ते दुरुस्त केले गेले आणि सर्वात चांगलं हे विमान मानलं जातं
बोईंगबाबत बोलायचं तर मागील १५-२० वर्षात आवाज उठतोय
एअर बस हे सर्व करतंय असा आरोप होतो
कारण जगात दोनच कंपन्या आहेत एअरबस आणि बोईंग जे १००-५०० प्रवासी क्षमतेची विमानं बनवतात
मात्र, बोईंगमध्ये बऱ्याच तक्रारी येताना दिसतात ही वस्तुस्थिती आहे
मेन्टेनन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग इश्यू असल्याचे आरोप होतात
बारीक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होतात
काही व्हिसरब्लोअर यांचा मृत्यू झाला ज्यांनी आवाज उचलला होता, काही तर बोईंगमध्ये काम करणारी होती…
बोईंग मोठी कंपनी होती, एफएए हे देखील बोईंगच्या बाजूनं होतं
Ahmedabad Plane Crash Live: अहमदाबादमधील विमान अपघात स्थळाची पाहणी केल्यानंतर, तसेच जखमींना भेटल्यानंतर आणि विजय रुपानी यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दिल्लीला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
भाजप आमदार महेश बालदी हे अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या हवाई सुंदरी मैथली पाटील यांच्या निवासस्थानी काही वेळात येणार आहेत
सध्या मैथलीच्या घरी गावातील लोक शोक व्यक्त करत आहेत
तिचे बाबा मोरेश्वर पाटील यांना मुलीच्या अपघाताचा धक्का बसला आहे
मैथली पाटील यांच्या आई या अहमदाबाद मध्ये डीएनए चाचणी साठी गेलेल्या आहेत
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते . मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं . रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.
रोशनीनला लहानपणा पासूनच एअर कृ बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोषणाईचा दुर्दैवी मृत्यू झालाय.. सध्या तिच्या घराजवळ तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे देखील तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला यावेळेस राजेश मोरे यांनी या दुर्घटनेमध्ये डोंबिवलीतील मुलगी मृत्यू झाला सर्वत्र शोक काळ पसरला आहे तिचा भाऊ आणि तिचे वडील हे अहमदाबादला निघाले असून तिची आई दुःखात आहे सर्वात मोठी डोंबिवली ही घटना घडली असल्याचे सांगितले
बीजे मेडिकल बाहेर आपल्या आई सोबत चहाचा ठेला लावणारा पंधरा वर्षीय आकाश याचा विमान अपघातात मृत्यू, तर आपल्या मुलाला वाचवणारी आई सुद्धा गंभीर जखमी
बीजे मेडिकल हॉस्टेलच्या बाहेर चहाचा ठेला लावणाऱ्या पंधरा वर्षाचा मुलाचा मृत्यू कालच्या विमान अपघात
झाला... हा चहाचा केला चालवणारी आई सुद्धा आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाली असून सिविल रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे
काल विमान बीजे मेडिकल हॉस्टेलवर कोसळल्यानंतर या विमानाचे काही तुकडे हे चहाचा केला असलेल्या ठिकाणी आले.... आणि त्या ठिकाणी आगीचा भडका उडाला... त्या आगीत आकाश आला... आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना आई सुद्धा या आगीत जखमी झाली
Air India Plane Crash In Ahmedabad: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेचा आढावा घेत आहेत. यावेळी त्यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत राम मोहन नायडू देखील उपस्थित होते.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघाताची (Ahmedabad plane crash) अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. या विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला असून काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अशातच आता ब्रिटिश उच्चायुक्तालयाचे अधिकारी अहमदाबाद देशांतर्गत विमानतळावर पोहोचले आहेत.
अहमदाबाद एयरपोर्टवर नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे
बैठकीत विमान अपघातावर चर्चा होत आहे
बैठकीत अनेक अधिकारी आणि मंत्री उपस्थित
Ahmedabad Plane Crash News Live: पंतप्रधान मोदी अपघातस्थळाची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत सीआर पाटील, हरीश संघवी, राम मोहन नायडू आणि भूपेंद्र पटेल देखील उपस्थित आहेत.
Ahmedabad Plane Crash News LIVE: पंतप्रधान मोदी अपघातस्थळी पोहोचले आहेत आणि पायी चालत संपूर्ण परिसराची पाहणी करत आहेत. पंतप्रधान मोदींसोबत इतर मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित आहेत.
Ahmedabad Plane Crash News LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अपघातस्थळी पोहोचला आहे. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वीच अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत.
Ahmedabad Plane Crash News LIVE: पंतप्रधान मोदी अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार यांना भेटतील. ते माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबियांनाही भेटतील. एअर इंडियाच्या विमानात विजय रुपानी उपस्थित होते.
PM Modi at Ahamdabad: पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून ते विमान दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. तसेच, दुर्घटनेतील जखमींशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच पंतप्रधान मोदी मृतांच्या नातेवाईकांनाही भेटणार आहेत.
एअर इंडियाकडून चार शहरांत मदतकेंद्रे स्थापन
अहमदाबाद,मुंबई,दिल्ली,गॅटविक विमानतळावर मदत केंद्रे
कुटुंबीय,नातेवाईकांच्या मदतीसाठी मदत केंद्रे
कुटुंबीय,नातेवाईकांना अहमदाबादेत पोचण्यासाठी सेवा उपलब्ध
भारतीयांच्या मदतीसाठी १८००, ५६९१, ४४४ हा हॉटलाइन उपलब्ध
भारताबाहेर कॉल करण्यासाठी+९१ ८०६२७७९२०० हा हॉटलाइन नंबर
एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.
दुर्घटनेची चार संभाव्य कारणं?
1) विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा...
2) लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो...
3) पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी...
4) टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत...
अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा समावेश
गेल्या दोन वर्षापासून मैथिली ऐअर होस्टेज म्हणून कार्यरत होती.
गेल्या दोन महिन्या पासून ती आंतरराष्ट्रीय विमानात रूजू झाली होती.
ही तिची आंतरराष्ट्रीय ७ वी टूर होती.
मैथिली पाटील हिच्या मृत्यू मुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मैथालीची आई , मामा आणि भाऊ गुजरात ला गेले आहेत.
आतापर्यंत 192 नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आल्या आहेत
डी एन ए टेस्ट आणि डीएनए मॅच साठी 72 तास लागणार आहेत
काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्याने अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणे बाकी आहे
डी एन ए मॅच झाल्यानंतर मृतदेह हे नातेवाईकांना सोपवले जातील
अहमदाबादच्या सिव्हील रुग्णालयात कालच्या दुर्घटनेतील मृत प्रवाशांचे शवविच्छेदन सुरु आहे..
अनेक नातेवाईक मृतदेहाची ओळख पटत नसल्याने चिंतेत आहेत..
डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सुपुर्त केले जाणार
विमान दुर्घटनेतले मृतदेह ओळखण्यापलीकडचे, मृतांच्या सर्व कुटुंबीयांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवणार, गृहमंत्री अमित शाहांची माहिती..मृतदेहाची ओळख पटत नसल्याने नातेवाईक चिंतेत
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसाठी १२०६ अंक सुदैवी आणि दुर्दैवी
१२०६ अंक सुदैवी असल्याची रुपाणींची आयुष्यभर भावना
रुपाणींच्या कार, स्कूटरला होता १२०६ नंबर
१२०६ अंकाबद्दल रुपाणी भरभरुन बोलायचे अशा मित्रांनी जागवल्या आठवणी
दुर्दैवानं रुपाणींचा २०२५ च्या १२/०६ तारखेला विमान दुर्घटनेत मृत्यू
अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय. तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ जणांवर काळाचा घाला..मुख्य वैमानिक सुमीत सबरवाल मुंबईचा रहिवासी...तर क्रू मेंबरमधील अपर्णा महाडिक तटकरेंची नातेवाईक.. तर बदलापूरच्या दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू
विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून १ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार, डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार...टाटा समुहाची १ कोटींची मदत, हॉस्टेलही बांधून देणार
अहमदाबादचं दुर्घटनाग्रस्त विमान कोसळलेल्या हॉस्टेलमधल्या २४ डॉक्टरांचा आतापर्यंत मृत्यु, २० जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक,दोन विद्यार्थी अजूनही बेपत्ता..२४ डॉक्टरांचा हकनाक मृत्यू
अहमदाबाद विमान दुर्घटनेत विमानातल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यु, भारतीय वंशाचा एक ब्रिटीश नागरिक चमत्कारिकरित्या बचावला..विमानातले २४१ प्रवासी ठार, एक वाचला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेचा आढावा घेणार, एक जखमी प्रवासी आणि हॉस्टेलच्या जखमी डॉक्टरांशीही संवाद साधणार..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- भारत
- Ahmedabad Plane Crash News Live: अहमदाबाद विमान अपघाताची एटीएस करणार चौकशी , घटनास्थळावरून सापडला डीव्हीआर