Russia-Ukraine War : युक्रेन-रशियामध्ये (Ukraine-Russia War) युद्ध सुरू आहे, युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) चालवली जात आहे. मात्र युक्रेनमध्ये एक विद्यार्थीही अडकला होता, ज्याने भारतात परतण्यासाठी अजब अट ठेवली होती.
व्हिडिओ शेअर करून मागितली होती मदत
कौशिक नावाचा हा विद्यार्थी खार्किव नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो, तो मूळचा डेहराडून, उत्तराखंडचा आहे. ऋषभने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने सांगितले होते की त्याच्यासोबत त्याचा कुत्रा देखील आहे ज्याला तो युक्रेनमध्ये सोडू शकत नाही. त्यामुळे भारत सरकारने कुत्र्याला विमानात आणण्यासाठी एनओसी द्यावी. विद्यार्थ्याने सांगितले की जर त्याचा कुत्रा मालिबो त्याच्यासोबत आला नाही तर तोही युक्रेनमधून भारतात परतणार नाही. विद्यार्थ्याच्या या व्हिडीओनंतर भारतीयांना त्यांच्या जनावरांसह परतण्याची परवानगी द्यावी, असे आवाहनही पेटाच्या वतीने भारत सरकारला करण्यात आले होते. यानंतर, भारत सरकारकडून ही मागणी मान्य करत, एक वेळची सूट म्हणून युक्रेनमध्ये राहणारे भारतीय तेथून फ्लाइटमध्ये आपले कुत्रे आणि मांजर सोबत आणू शकतात, असे सांगण्यात आले.
Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, बॉम्बहल्ले अजूनही सुरूच
युक्रेनमध्ये अजूनही लोक अडकले आहेत
ऋषभ कौशिक यांनी सांगितले की, सरकारकडून कोणतीही एनओसी मागितली गेली नाही आणि तो 219 भारतीयांसह हंगेरीहून दिल्लीला पोहोचला. त्यानंतर आता तो आपल्या घरी निघून गेला. युक्रेनमध्ये अजूनही अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी युक्रेनवर रशियाचा हल्ला वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. सध्या शेजारील देशांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात आहे.
Ukraine Russia War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पात आग