Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine) युद्धाचा आज नववा दिवस असून ही लढाई आता दिवसेंदिवस वाढत आहे. भारत सरकारच्या माहितीनुसार, अजूनही काही भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव्ह (Kyiv) आणि सर्वात मोठे शहर खार्किव (Kharkyiv) येथे अडकले आहेत. रशियन सैन्याने (Russian Army) गेल्या 24 तासांत खार्किव, चेर्निहाइव्ह, बोरोदयांका, मारियुपोल येथे जोरदार बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अवघ्या 24 तासांत जवळपास 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बॉम्बहल्ले सुरू असतानाच एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली, त्यानंतर त्याला कीव्ह येथे पुन्हा पाठवण्यात आल्याचे भारत सरकारने सांगितले आहे.


कीवहून आलेल्या एका विद्यार्थ्याला गोळी लागली - व्ही के सिंग
युक्रेनचा शेजारचा देश पोलंडमध्ये असलेले केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंह यांनी सांगितले की, आज कीव्ह येथे एका विद्यार्थ्याला गोळी लागली. अशावेळी कमीत कमी नुकसान होऊन जास्तीत जास्त मुलांना बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सिंह यांनी सांगितले की, आणखी 1600-1700 मुलांना भारतात पाठवायचे आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे 1400 विद्यार्थांना विमानाने पाठवण्यात आले आहे. काही विद्यार्थी वॉर्सा येथे पोहोचली होती आणि त्यांनी नातेवाईकांकडे राहण्याचा निर्णय घेतला. सिंह म्हणाले की, उद्या आम्ही एकूण 5 विमानांनी 800-900 मुलांना भारतात पाठवू. मुलांना राहण्यासाठी आम्ही येथे तात्पुरती व्यवस्था केली आहे.




 


युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याचे अभियान सुरूच 


युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याचे अभियान सुरू आहे. आज, यूकेमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाची दोन सी-17 विमाने रोमानियामधील बुखारेस्ट आणि हंगेरीमधील बुडापेस्ट येथून गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावर पोहोचली. केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांचे स्वागत केले. रात्री उशिरा सुमारे 700 विद्यार्थी हवाई दल आणि एअर इंडियाच्या विमानाने देशात परतले आहेत. उद्या म्हणजेच 5 मार्चपर्यंत आणखी 15 हजार मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न असणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha