Viral Video : आजकाल, साहसी आणि थ्रिलर खेळाचे व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर सर्वात रोमांचक आणि साहसी व्हिडिओ शोधताना आणि शेअर करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अशा खेळाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती बैलाच्या पाठीवरून खाली पडताना दिसत आहे. त्यानंतर चिडलेला बैल त्या व्यक्तीला शिंगावर घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र अचानक त्याचे वडील समोर येऊन मुलाला वाचवताना दिसत आहेत.
टेक्सासमधील रोडीओमध्ये रिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच कोडी हूक्स बैलाच्या पाठीवरून खाली पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. बैलाच्या उसळीमुळे कोडी हूकला त्याचा तोल सांभाळता आली नाही आणि हवेत उडत जोरात जमिनीवर कोसळला. त्यानंतर तो जमिनीवर बेशुद्ध पडला. यानंतर रागावलेला बैल इकडे-तिकडे रिंगणात उड्या मारताना दिसतो.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majhahttps://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA