Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुमारे एक महिन्यापासून सुरु आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीदेखील सध्याचे अमेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मी सत्तेत असतो तर युद्ध झाले नसते', असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच ट्रम्प यांनी युक्रेनच्या संकटाशी बायडेन यांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
'मी सत्तेत असतो तर युद्ध झाले नसते'
डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जॉर्जियामध्ये कॉमर्स विषयावरील मोठ्या GOP रॅलीमध्ये हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, 'बायडेन यांची युक्रेन केलेली वागणूक चुकीची असून त्यांनी तसे करायला नको होते. मी सत्तेत असते तर हे युद्ध कधीच झाले नसते.'
युद्धासाठी बायडेन दोषी - ट्रम्प
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नंतर म्हटले की बायडेन यांचा युक्रेनशी काहीही संबंध नाही. या कार्यक्रमात त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या वादग्रस्त व्यावसायिक करारांचाही उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले की, युक्रेनवर आक्रमण कोणत्याही किंमतीत व्हायला नको होते. त्यांनी या युद्धासाठी बायडेनला जबाबदार धरले आहे.
'बायडेन यांनी माहित नाही की ते काय करत आहेत'
ट्रम्प पुढे म्हणाले की, 'आमच्याकडे एक असा राष्ट्रपती आहे ज्यांना आपण काय करतोय आणि कुठे आहे याची कल्पना नाही. ते खूप काही करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला अभिनय करत आहेत. पण प्रत्यक्षात तसं काही नाही. सध्या युक्रेनवर सातत्याने बॉम्बहल्ला होत आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमधील इंधन डेपोवर क्षेपणास्त्र हल्ला, आग विझवण्यासाठी लागले 14 तास
- Russia Ukraine War : युद्धादरम्यान जर्मनीकडून युक्रेनच्या पाठीशी, 100 मशीन गन आणि 1,500 क्षेपणास्त्रे युक्रेनमध्ये दाखल
- Russia Ukraine War : लाखो डॉलर्स घेऊन पळून जात होती युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी, सुटकेससह हंगेरियन सीमेवर सैनिकांनी पकडले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha