Russia Ukraine Conflict :  युक्रेन-रशियामध्ये (Ukraine-Russia War) युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील युद्धामुळे सध्या त्या देशातील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. उद्याचा दिवस कसा असेल याची शाश्वती नाही. तरीही अनेकांनी जगण्याची आशा मात्र सोडलेली नाही. दिमित्रो आणि अॅना हे त्याचंच एक उदाहरण.. युक्रेनच्या किव्ह शहरात युद्ध सुरु असतानाच दिमित्रो आणि अॅना हे विवाह बंधनात अडकलेत आहेत.  काल त्यांनी किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला.


 सात वर्षापूर्वी डोनस्टेकमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु असताना दिमित्रो - अॅना एकमेकांना भेटले होते.  याच संघर्षाच्या काळात त्यांचं प्रेम फुलंलं. भविष्य कसं असेल याची कल्पना नाही मात्र आताचा क्षण एकमेकांसोबत जगण्यासाठी ही लग्नगाठ बांधल्याचं या दाम्पत्यानं सांगितलं. त्यामुळे युद्ध सुरु असतानाच त्यांनी लग्न बंधनात अडण्याचा निर्णय घेतलाय. युद्धामुळे भविष्यात काय होईल हे माहित नाही. त्यामुळे आम्ही आत्ताच लग्न करण्याचा निर्णय  घेतलाय, अशी प्रतिक्रिया या नवविवाहीत जोडप्यानं दिली आहे. 


रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पण हा युद्ध विराम संपूर्ण  युक्रेनमध्ये नसून मारियोपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये जाहीर झाला आहे. या दोन्ही भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी युद्धबंदीनंतर  ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आलाय.  युक्रेनच्या वेळेनुसार सकाळी 9 ते दुपारी चार अशी ही युद्धबंदी आहे.. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता या युद्धबंदीला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेसातपर्यंत ही युद्धबंदी असेल. रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेत या तात्पुरत्या युद्धबंदीवर एकमत झालं होतं. त्यानुसार आज ही तात्पुरती युद्धबंदी करण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या :


Russia-Ukraine War : भारतीय विद्यार्थ्याने युक्रेन सोडण्यासाठी घातली अट, मग 'असा' पोहोचला भारतात!