Rosetta Stone : ब्रिटनच्या ताब्यात असलेला कोहिनूर हिरा भारताला परत करावा या भारतीयांच्या मागणीपाठोपाठ आता ब्रिटिशांकडे असलेला रोसेटा स्टोन परत देण्याची मागणी इजिप्तने (Egypt) केली आहे. इजिप्तच्या पुरातत्त्व विभागातील प्रमुखांनी ब्रिटनकडे ही मागणी केली. सध्या रोसेटा स्टोन ही ब्रिटिश संग्रहालयात आहे. रोसेटा स्टोन परत मिळवण्यासाठी इजिप्तमध्ये स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
रोसेटा स्टोन इसवी सन पूर्व 196 चा आहे. 1799 साली नेपोलियनच्या सेनेला रोसेटा स्टोनविषयी माहिती मिळाली. अलेक्झांड्रियाच्या करारात नेपोलियनच्या पराभावानंतर रोसेटा स्टोन ब्रिटनने आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर हा स्टोन 1802 साली ब्रिटिश संग्रहालयात ठेवण्यात आला. या स्टोनवर तीन वेगवेगळ्या भाषेत संदेश लिहिण्यात आला आहे.
नेपोलियनने लावला होता शोध
रोसेटा स्टोन इसवी सन पूर्व 196 चा आहे. 1799 साली नेपोलियनच्या सेनेला इजिप्तच्या उत्तर भागामध्ये असलेल्या रोसेटा स्टोनविषयी माहिती मिळाली. 1801 साली झालेल्या अलेक्झांड्रियाच्या करारात हा स्टोन ब्रिटनला पाठवण्यात आला. फ्रेंच जीन फ्रेंकोइस चेम्पोलियने 1822 साली डेमोटिक आणि प्राचीन ग्रीकचा वापर करत शिलालेख समजून घेतला. त्यामुळे प्राचीन इजिप्तशियन भाषा आणि संस्कृती समजून घेण्यास मदत झाली.
इजिप्तच्या पुरातत्त्व खात्याच्या प्रमुखांनी या पूर्वी देखील रोसेटा स्टोनची मागणी केली होती. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील देशांमधून ब्रिटनने आणलेल्या कलाकृती परत करण्यासाठी सध्या सर्व देश प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे ब्रिटिश संग्रहालयाचे प्रवक्ता म्हणाले की, रोसेटा स्टोन परत मिळवण्यासाठी इजिप्त सरकारकडून कोणतेही विनंती आलेली नाही.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यानंत ब्रिटिश साम्राज्याने राजवटीखालील इतर देशांमधून बळकवलेल्या वस्तू परत करण्याची मागणी जोर धरत आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असलेल्या खजिन्याची चर्चा सुरु झाली आहे. ब्रिटिश साम्राज्याने राजवटीखालील इतर देशांमधून बळकवलेल्या वस्तू परत करण्याची मागणी जोर धरत आहे. कोहिनूर हिरा परत द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात येत आहे तर ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका मिळावा अशी मागणी आफ्रिकेने केली आहे.