Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशकं एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. महाराणी एलिझाबेथ यांचं नाव जेव्हा येतं, तेव्हा कोहिनूरचा उल्लेख नक्की केला जातो. महाराणी एलिझाबेथ यांच्या मुकुटावर (Crown) कोहिनूर हिरा जडवण्यात आला होता.
कोहिनूर म्हणजे, जगातील सर्वात किमती हिऱ्यांपैकी एक. चौदाव्या शतकात 105.6 कॅरेटचा कोहिनूर हिरा भारतात (INDIA) आढळला होता. 1849 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं पंजाब (Punjab) वर कब्जा केला. त्यानंतर कोहिनूर हिरा ताबा इंग्रजांकडे गेला. त्यानंतर कोहिनूर महाराणी व्हिक्टोरिया (Queen Victoria) यांच्या मुकुटावर जडवण्यात आला होता. 1937 रोजी किंग जॉर्ज VI (George VI) यांच्या राज्याभिषेकावेळी एलिझाबेथ यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्लॅटिनमच्या मुकुटावर कोहिनूर जडवण्यात आला होता. हा मुकुट टॉवर ऑफ लंडनमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
आता कोणाकडे जाणार हिरा?
आता महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांना राजा बनवण्यात आलं असून हा हिरा आता चार्ल्सची पत्नी कॅमिला यांच्या डोक्यावर दिसणार आहे. राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल 73 वर्षीय चार्ल्स म्हणाले, "माझी प्रिय आई महाराणी यांचं निधन हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी अतिशय दुःखद क्षण आहे." दरम्यान, ब्रिटीश सिंहासनावर विराजमान होणारे चार्ल्स हे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत.
2021 मध्ये पतीचा मृत्यू
राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांनी लग्नाची 73 वर्ष पूर्ण केली आणि यासोबतच त्यांचे प्रिन्स फिलिपनं यांनी त्यांचा कायमचा निरोप घेतला. 99 वर्षीय प्रिन्स फिलिप यांचं 9 एप्रिल 2021 रोजी निधन झालं. त्यावेळी हे शाही जोडपं कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान लंडनमधील विंडसर कॅसलमध्ये राहत होते.
जेव्हा महाराणी म्हणाल्या होत्या, "माझं आयुष्य तुमच्या सेवेसाठीच"
राजकुमारी एलिझाबेथ म्हणून ज्यावेळी त्यांनी त्यांचा 21वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी त्यांनी देशाला पहिल्यांदा संबोधित केलं होतं. त्यांचं हे भाषण केप टाऊनमधून (Cape Town) रेडिओवर ब्रॉडकास्ट करण्यात आलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या की, "मी याची घोषणा करते की, माझी आयुष्य लहान असो वा मोठं नेहमीच तुमच्या सेवेसाठी असेल."