NASA Asteroid Crash : नासाच्या 'डार्ट' या अवकाशयानाकडून जाणूनबूजून आदळलेल्या उल्कापिंडचा (Asteroid) ढिगारा हजारो किलोमीटरच्या वातावरणात पसरला आहे. नासाच्या दुर्बिणीने घेतलेल्या नव्या छायाचित्रावरून ही बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'डबल अॅस्टरॉइड रीडायरेक्शन टेस्ट' (DART) स्पेसक्राफ्टने 26 सप्टेंबर रोजी डिमॉर्फोस नावाच्या उल्कापिंडाला जाणूनबुजून धडक दिली.  हा डिडमॉस नावाच्या लघुग्रहाचा दगड होता. दरम्यान, ही पहिली ग्रह संरक्षण चाचणी होती, ज्यामध्ये अंतराळयानाच्या प्रभावाने लघुग्रहाच्या कक्षा बदलण्याचा प्रयत्न केला


या नवीन फोटोमध्ये दिसल्या धुळीच्या खुणा 
डार्टशी टक्कर झाल्यानंतर दोन दिवसांनी, खगोलशास्त्रज्ञांनी चिलीमधील दुर्बिणीचा वापर करून छायाचित्रे घेतली. नासाच्या 4.1-मीटर दक्षिणी खगोल भौतिकी संशोधन (SOAR) दुर्बिणीचा वापर करून लघुग्रहाच्या पृष्ठभागावरून उडालेल्या धूळ आणि ढिगाऱ्याची ही छायाचित्रे होती. या नवीन फोटोमध्ये धुळीच्या खुणा दिसल्या. सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या दाबाने दूर ढकलले गेलेले इजेक्टा हे धूमकेतूच्या शेपटीप्रमाणे दिसले. 


 






 स्पष्ट चित्र काढल्याने संशोधकांमध्ये आनंद


संशोधकांनी सांगितले, ज्या वेळी फोटो घेण्यात आले, त्या वेळी डिडमॉसचे अंतर पृथ्वीच्या टक्कर होण्याच्या ठिकाणापासून किमान 10,000 किलोमीटर असेल. लोवेल वेधशाळेचे टेडी कॅरेटा म्हणाले, "टक्कर झाल्यानंतरच्या काही दिवसांत आम्ही या संरचनेचे आणि त्याच्या सीमांचे इतके स्पष्ट चित्र काढू शकलो हे आश्चर्यकारक आहे."


नासाचे 344 दशलक्ष डॉलर्सचे अंतराळयान


यूएस स्पेस एजन्सी नासाचे 344 दशलक्ष डॉलर्सचे अंतराळयान पृथ्वीचे क्षुद्रग्रहांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात गुंतले होते. त्याला डबल एस्टेरॉयड रिडायरेक्शन टेस्ट (DART) मिशन म्हणजेच DART असे नाव देण्यात आले आहे. याच्या माध्यमातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहांची दिशा वळवण्याचे तसेच त्यांना तोडण्याची टेक्निक पाहिली जात होती. नासाने त्याचे थेट प्रक्षेपणही केले होते.


जाणूनबुजून डिमॉर्फोस लघुग्रहाशी आदळले


डार्ट मिशनचे हे यान सुमारे 10 महिन्यांपूर्वी पृथ्वीवरून सोडले होते. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी ते जाणूनबुजून डिमॉर्फोस लघुग्रहाशी आदळले. 24,000 किमी प्रतितास वेगाने प्रवास करणाऱ्या डार्टची  डिमॉर्फोसशी टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले होते.


संबंधित बातम्या


Solar Flare : सूर्यावर पुन्हा स्फोट, NASA ने शेअर केला फोटो, सौरवादळाचा पृथ्वीवरही होणार परिणाम