Four women head to Antarctica : अंटार्क्टिकामधील (Antarctica) जगातील सर्वात दुर्गम पोस्ट ऑफिस म्हणजेच पेंग्विन पोस्ट ऑफिस चालवण्यासाठी क्लेअर बॅलेंटाइन, मेरी हिल्टन, नताली कॉर्बेट आणि लुसी ब्रुजन या चार महिलांची निवड करण्यात आली आहे. या महिला या बेटावरील पेंग्विनची गणना करतील. हे जरी ऐकायला सोपे वाटत असले तरी, ते सोपे काम देखील नाही. पाच महिन्यांत या महिला कामगारांना वीज, शुद्ध पाणी आणि वाय-फाय यासारख्या सुविधांशिवाय जगातील सर्वात थंड प्रदेशात राहावे लागेल.


आव्हानात्मक कामासाठी यातील चार महिलांची निवड


ब्रिटनच्या अंटार्क्टिक हेरिटेज ट्रस्टने गौडियर बेटावरील पोर्ट लॉकरॉय बेससाठी अर्ज मागवले होते. त्यामध्ये अशी अट घालण्यात आली होती की, अर्जदार शारीरिकदृष्ट्या मजबूत, पर्यावरणाबाबत जागरूक आणि किमान साधनांसह जगण्यास सक्षम असावा. दरवर्षी या नियुक्त्यांसाठी शेकडो अर्ज आले होते, परंतु यावेळी सुमारे 6,000 लोकांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या आव्हानात्मक कामासाठी यातील चार महिलांची निवड करण्यात आली.




हिल्टन हिच्याकडे तपासणीची जबाबदारी
अंटार्क्टिकामधील सुमारे 18,000 पर्यटक दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत गौडियर बेटावरील पेंग्विन प्रदेशाला भेट देतात. हेरिटेज ट्रस्ट येथील वारसा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याचा समृद्ध इतिहास सांगण्यासाठी या नियुक्त्या करते. स्कॉटलंडची 30 वर्षीय हिल्टन ही प्राणीशास्त्रज्ञ आहे. तिला 1,500 जेंटू पेंग्विनच्या वसाहतीचे पर्यवेक्षण करण्याचे काम दिले आहे.


नताली गिफ्ट शॉप, तर क्लेअरला पत्रांची जबाबदारी
ब्रिटनच्या 31 वर्षीय नताली कॉर्बेटचे नुकतेच लग्न झाले. नतालीने या सहलीला 'सोलो हनीमून' म्हटले आहे. ती गौडियर बेटावरील गिफ्ट शॉपची जबाबदारी सांभाळेल. 23 वर्षीय क्लेअरने नुकतेच ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थ सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या बेटावरून दरवर्षी जगातील 100 देशांना पाठवल्या जाणाऱ्या सुमारे 80 हजार पत्रांची जबाबदारी ती सांभाळणार आहे. त्याचप्रमाणे लंडनमधील 40 वर्षीय शास्त्रज्ञ लुसी संघ व्यवस्थापन तसेच बेटावरील सर्व जहाजांना भेटी देण्याचे समन्वय साधतील.


महत्वाच्या बातम्या :