Queen Elizabeth II Death : महाराणी गेल्यानंतर वेगवेगळ्या देशांकडून कोहिनूर परत करण्याची मागणी
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असलेल्या खजिन्याची चर्चा सुरु झालीय. ज्या देशांकडून किंवा खंडाकडून हा खजिना नेण्यात आला किंवा लुटण्यात आला तो परत द्यावा अशी मागणी जोर धरु लागलीय. कोहिनूर हिरा परत द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात येतेय. कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथाचा असल्याचा दावा ओडिशातील एका संघटनेनं केलाय. हा कोहिनूर हिरा ब्रिटनमधून ऐतिहासिक पुरी मंदिरात परत आणण्यासाटी संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केलीय. दक्षिण आफ्रिकेतून ब्रिटीश राजघराण्यात गेलेल्या एका खास हिऱ्याची मागणी सुरू झाली आहे. या हिऱ्याचं नाव ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका असं आहे. हा हिरा ब्रिटीशांनी परत द्यावा अशी मागणी आफ्रिकेत जोर धरू लागलीय. चेंज ऑर्ग या वेबसाईटवर हिरा परत देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 6 हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केलीय.