एक्स्प्लोर

राजपक्षेंचा राजीनामा, विक्रमसिंघे पुन्हा श्रीलंकेचे पंतप्रधान

श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सिरीसेना यांनी घेतलेल्या पावलांचा निषेध करत राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची सूचना केली. हा खटला अजूनही सुरू आहे. त्यामुळे अधिक गोंधळ होऊ नये म्हणून राजपक्षे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी शनिवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांची नेमणूक करण्याचा वादग्रस्त निर्णय अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी घेतला होता. आता रानिल विक्रमसिंघे यांचा पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून आज शपथविधी होईल. यामुळे श्रीलंकेत गेले दोन महिने सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. 26 ऑक्टोबरला राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांनी आपल्या विशेष हक्कांचा वापर करत विक्रमसिंगे यांना पंतप्रधानपदावरून बरखास्त केले. त्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाची लगेच शपथ घेतली. पण विक्रमसिंगेंच्या समर्थकांनी या घटनेचा कडाडून विरोध केला आणि संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. राजपक्षे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन महत्त्वपूर्ण निकालानंतर राजीनामा दिला आहे. न्यायालयाने संसद बरखास्त करण्याचा निर्णय व राजपक्षे यांची पंतप्रधानपदी करण्यात आलेली नेमणूक घटनाबाह्य ठरवली होती. सिरीसेना यांचा संसद बरखास्तीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातच बेकायदा ठरवला होता. राजपक्षे यांना पुढील महिन्यात पूर्ण सुनावणी होईपर्यंत पंतप्रधानपद ग्रहण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मनाई केली होती. सिरीसेना यांनी त्यांना पुन्हा पंतप्रधानपद देण्याची तयारी दर्शवली होती. गेल्या काही वर्षांत श्रीलंकेच्या संविधानात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे राष्ट्रपतींचे अनेक विशेष अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यामुळे नवीन नियमांच्या आधारे सिरीसेना यांनी उचलेली पाऊलं वैध आहेत की नाही असा प्रश्न विचारणारी याचिका श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सिरीसेना यांनी घेतलेल्या पावलांचा निषेध करत राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची सूचना केली. हा खटला अजूनही सुरू आहे. त्यामुळे अधिक गोंधळ होऊ नये म्हणून राजपक्षे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. अध्यक्षांच्या सचिवालयाने विक्रमसिंघे यांचा शपथविधी उद्या सकाळी होणार असल्याचे जाहीर केले आहे, असे विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीचे सरचिटणीस अकिला विराज कैरियावासम यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget