Punjabi Family Kidnapped In California : अमेरिकेत आठ महिन्याच्या मुलीसह एका कुटुंबाचे अपहरण (Family Kidnapped In California) करण्यात आले आहे. आठ महिन्यांच्या मुलीसह चार जणांचे अपहरण करण्यात आले आहे. कॅलिफोर्निया पोलिसांनी (california police)  ही माहिती दिली आहे. तसेच पोलिसांनी संशयित व्यक्तीचा फोटो देखील जारी केला आहे. 


जसदीप सिंह, त्यांची पत्नी जसलीन कौर, आठ महिन्यची मुलगी आरोही ढेरी आणि जसदीप सिंह यांचे भाऊ अमनदीप सिंह अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. सिंह कुटुंब हे मूळचे पंडाबमधील होशीयारपूर येथील टांडा उडमुड या गावचे आहेत. कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, जसदीप आणि अमनदीप यांचे त्यांच्या ऑफिसमधील एका व्यक्तीने अपहरण केले आहे.


बंदुकीच्या धाक दाखवत चार जणांचे अपहरण


एक व्यक्ती भिकारीच्या वेशात त्यांच्या ऑफिसमध्ये आली आणि बंदुकीच्या धाक दाखवत चार जणांचे अपहरण केले. अपहरण करण्यासाठी दोन भावांनी कारचा वापर केला होता. घटनास्थळावरून अपहरण झालेल्या व्यक्तीचे मोबाईल पोलिसांना मिळाले असून कुटुंबाची कार जाळण्यात आली आहे.  अपहरणाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 


संशयित व्यक्तीचे छायाचित्र जारी 


अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुबांने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. कॅलिफोर्निया पोलिस तपास करत आहे. पोलिसांनी संशयित व्यक्तीचे छायाचित्र देखील जारी केले आहे. सध्या घटनेची जास्त माहिती देण्यात आलेली नाही. कुटुंबातील चौघांचे अपहरण हायवे 59 येथून करण्यात आला आहे. 


अपहरणकर्त्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. कारण अपहरण करणऱ्या व्यक्तीने  संपर्क साधला नाही तसेच खंडणीची मागणीही केलेली नाही. अपहरण केलेल्या व्यक्तीकडे शस्त्र आहेत. त्यामुळे ती धोकदायक आहे.  या प्रकरणी चौकशी सुरू असून त्यांच्या ऑफिसमधील, घराजवळ राहणाऱ्या अनेकांची चौकशी केली जात आहे. अपहरण केलेल्या व्यक्तीशी किंवा पीडितांशी  कोणीही संपर्क करू नये, असे आवाहन कॅलिफोर्निया पोलिसांना जनतेला केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :