Iran Hijab Protest : इराणमध्ये (Iran) सध्या हिजाबवरून (Hijab Controversy) वातावरण आणखीनच तापलेलं पाहायला मिळत आहे. महिलांनी हिजाबविरोधी (Iran Hijab Protest) सुरु केलेल्या चळवळीला आता हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या कोठडीत महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू (Mahsa Amini Death) झाल्याने या आंदोलनाला सुरुवात झाली होती. महसा अमिनी (Mahsa Amini) या 22 वर्षीय महिलेने हिजाब न घातल्याने पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर पोलीस कोठडीतच तिचा मृत्यू झाला. याविरोधात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. त्यानंतर आता आणखी एका तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला आहे. सुरक्षा दलांनी संशयास्पद जखमा असणारा आणखी एका तरुणीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवला आहे.


संशयास्पद जखमा असणारा तरुणीचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला


इराणमधील पोलिसांनी एका 17 वर्षीय तरुणीचा (Nika Shakarami Death) मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. मात्र या तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला. मध्य तेहरानमधील आंदोलनादरम्यान बेपत्ता झाल्यानंतर या तरुणीचा मृतदेह (Nika Shakarami) सापडला आहे. या तरुणीच्या मृतदेहावर अनेक संशयास्पद जखमा आहे. सुरक्षा दलांनी या तरुणीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवला तेव्हा तिच्या शरीरावर शारीरिक छळ झाल्याच्या अनेक जखमा होत्या. या तरुणीचं नाक तुटलं होतं. याशिवाय मेंदूच्या कवटीवरही अनेक जखमा होत्या.






हिजाबविरोधी आंदोलनावेळी तरुणी बेपत्ता


20 सप्टेंबर रोजी, तेहरानमधील एका हिजाबविरोधी आंदोलनात 17 वर्षीय तरुणी निका शकरामी (Nika Shakaram) सहभागी झाली होती, यावेळी ती गायब झाली. यानंतर नऊ दिवसांनी अनेक जखमा असणारा निकाचा मृतदेह पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडे दिला. यावरून इराणमधील सुरक्षा यंत्रणा आणि सुरक्षा दलांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या