नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केवळ भारतातच (india) नाही, तर जगभरात वाढली आहे. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या (global leader approval rating) यादीत ते अव्वल स्थानावर आहेत. 


72 टक्क्यांनी पटकावले अव्वल स्थान 
अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टने नुकतेच जगभरातील नेत्यांच्या लोकप्रियतेवर सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden), यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (boris johnson) यांना मागे टाकत पुन्हा 72 टक्क्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. 


अनुभवी नेत्यांना मागे टाकले
ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेटिंग 72 टक्के आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना मागे टाकले आहे. 




 


यादीत कोण कोणत्या क्रमांकावर?
ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आहेत, ज्यांचे रेटिंग 64% टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचे रेटिंग 57% आहे. त्यानंतर या यादीत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा ( 47%) आणि जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झो (42%) आहेत.


13 देशांच्या नेत्यांवर सर्वेक्षण


अमेरिकेची डेटा इंटेलिजेंस फर्म मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजेंस सध्या अमेरिकेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि युनायटेड किंगडममधील नेत्यांच्या रेटिंगचे निरीक्षण करत आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन सहाव्या क्रमांकावर


ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सहाव्या क्रमांकावर असून त्यांचे रेटिंग 41% आहे. या यादीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (41%), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (41%), स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ (37%), दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन (41%), बोलसोनारो (36%), फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (35%) आणि यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (30%).


महत्त्वाच्या बातम्या: