Imran Khan China Tour : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी रविवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (China President Xi Jinping) यांची भेट घेतली. चार दिवसांच्या चीन दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी इम्रान खान यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली. या बैठकीनंतर संयुक्त निवेदनात चीन आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा राग आलापला. चीनने काश्मीरच्या मुद्द्याचे शांततापूर्ण निराकरण करण्याचे आवाहन करत एकतर्फी कृतींना विरोध केला.


चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या संथ गतीबद्दल बीजिंगची वाढती चिंता आणि पाकिस्तानमधील विविध प्रकल्पांवर काम करणार्‍या चीनी कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी इम्रान खान यांनी ही भेट घेतली. सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, खान यांच्याच्या भेटीत जिनपिंग म्हणाले की, राष्ट्रीय स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी चीन पाकिस्तानला पाठिंबा देतो. सीपीईसीच्या पूर्ण विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी चीन पाकिस्तानशी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचेही जिनपिंग यांनी म्हटले आहे.


संयुक्त निवेदनानुसार, "पाकिस्तानने चीनला जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवरील ताज्या घडामोडींची माहिती दिली. यावेळी चीनने पुनरुच्चार केला की, ''काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील वाद आहे आणि तो योग्य आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवला गेला पाहिजे. चीन परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करणाऱ्या कोणत्याही एकतर्फी कारवाईला विरोध करतो.''


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha