Arvind Kejriwal on Majha Katta : आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात आगामी निवडणूकांबाबत बोलताना विरोधी पक्षांवर टीका देखील केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला देताना केजरीवाल यांनी ते कशाप्रकारे देशातील सर्वात इमानदार व्यक्ती आहेत, हे सांगितले आहे.


देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणूका पार पडणार आहेत. दरम्यान आप पक्ष गोवा आणि पंजाब या निवडणूकांमध्ये निवडणूक लढवत आहेत. तर आप पक्षावर लोकांनी का विश्वास ठेवायचा याबद्दल केजरीवाल यांना विचारलं असता त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मला देशातील सर्वात इमानदार व्यक्ती असल्याचं प्रमाणपत्र दिलं असल्याचं सांगितलं आहे. केजरीवाल म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या घरी इनकम टॅक्स,ईडी अशा विविध विभागांना छापा टाकण्यास सांगितलं. पण त्यातून त्यांना काहीच मिळालं नाही, ज्यामुळे मी किती प्रामाणिक आहे, हे देखील समोर आलं.''  


अरविंद केजरीवाल हे एक आयटी ग्रॅज्युवेट असून त्यांनी एक सामान्य व्यक्ती ते थेट दिल्लीचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास केला. 2013 च्या निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर आप पार्टीचं तिसरं टर्म असून आता त्यांनी इतर राज्यात ही आपल्या पक्षाचा प्रसार करण्यास सुरुवात केला आहे. त्यांनी आता आगामी पाच राज्यांच्या निवडणूकीत पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha