एक्स्प्लोर
रशियात पेटत्या विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग, 41 प्रवाशांचा मृत्यू
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काल रात्री सुखोई सुपरजेट-100 या विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग करत असताना विमानाला आग लागली. या आगीमुळे विमानातील तब्बल 41 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काल रात्री सुखोई सुपरजेट-100 या विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग करत असताना विमानाला आग लागली. या आगीमुळे विमानातील तब्बल 41 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टीएएसएस न्यूज एजन्सीने याबाबतची वृत्त दिले आहे. हे विमान मॉस्कोवरुन मरमांस्कला जात होते.
दरम्यान विमानाने पेट घेतल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी अक्षरश: पेटत्या विमानातून उड्या मारल्या. विमानाला आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या विमानाने यशस्वी टेकऑफ केले. परंतु टेकऑफनंतर काहीच वेळात विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने विमानाचे लॅण्डिंग करायचे ठरवले. विमान लॅण्ड करत असताना विमानाच्या इंजिनने पेट घेतला.
VIDEO
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात एकूण 78 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.
जळणाऱ्या विमानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, विमान लॅण्ड करत असताना हेलकावे खात होतं. त्यानंतर विमानाच्या इंजिनने पेट घेतला. विमान रनवेवर उतरुन धावत असताना लोक आपत्कालीन दरवाज्यामधून बाहेर उड्या मारत आहेत.
Vladimir Putin has expressed his condolences to the families of those killed in the tragedy at Sheremetyevo airport
— President of Russia (@KremlinRussia_E) May 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement