एक्स्प्लोर
पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ फरार घोषित
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. पाकच्या एका विशेष कोर्टाने राष्ट्रदोहा प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही हजेरी न लावल्याने हा निर्णय घेतला आहे.
जस्टिस मझहर आलम खान मिनाखेल यांच्या अध्यक्षतेतील त्रिसदस्यीय समितीने मुशर्रफ यांना तीस दिवसांत हजर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
मुशर्रफ यांना फरार घोषित केल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात छापण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याशिवाय कोर्टाच्या बाहेर आणि मुशर्रफ यांच्या घराच्या परिसरातही त्यासंबंधी पोस्टर लावण्यास सांगितलं आहे.
परदेश दौऱ्यावर निर्बंध लादूनही मुशर्रफ उपचारांसाठी दुबईला गेले होते. परवेझ यांना परदेशी जाण्याची परवानगी कशी दिली, हा प्रश्न आधी कोर्टाने विचारला होता. त्यांच्यावर दाखल असलेल्या अनेक मोठ्या केसेस पाहता ते मायदेशी (पाकिस्तानात) न परतण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement