अलिशान घर, हेलिकॉप्टर अन् बरेच काही, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची संपत्ती किती?
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे.
Pakistan’s Imran Khan Lifestyle, Net Worth, Assets : इम्रान खान यांनी क्रिकेटर ते पंतप्रधान असा प्रवास केला. सत्ता गेल्यानंतर इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इम्रान खान यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पण एप्रिल 2022 मध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. सध्या त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे ते चर्चेत आहेत. इम्रान खान यांच्या संपत्तीबद्दलही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सीए नॉलेजच्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्याकडे 50 मिलियन डॉलर ( भारतीय चलनानुसार 410 कोटी रुपये) इतकी संपत्ती आहे. 70 वर्षीय इम्रान खान पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत.
इम्रान खान यांची संपत्ती किती ?
इम्रान खान यांच्याकडे इस्लामाबादमध्ये बानी गाला येथे 181,500 चौरस यार्ड इतकं मोठं घर आहे. या घराची किंमत 750 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. त्याशिवाय पार्क लाहोरमध्ये 29 मिलियन अमेरिकन डॉलरचं घर आहे.
इम्रान खान यांच्याकडे 0.8 मिलियन अमेरिकन डॉलरच्या किंमतीचे फार्महाऊसही आहे. त्याशिवाय वेगवेगळे व्यावसायही आहेत. तसेच खानदानी शेतीही आहे.
इमरान खान यांच्याकडे हेलिकॉप्टर :
इम्रान खान यांच्या नावावर कोणताही गाडी रजिस्टर्ड नाही. पण त्यांच्याकडे एक हेलिकॉप्टर आहे, त्याचा वापर ते दौऱ्यासाठी करतात. 'द नेशन'च्या एका रिपोर्टमध्ये म्हटलेय की, इम्रान खान यांच्या हेलिकॉप्टर प्रवासामुळे एक अरब रुपयांचे पाकिस्तानचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमधील संसदेत याबाबतची माहिती देण्यात आली होती. यामध्ये असे म्हटले होते की, 2019 ते 2021 यादरम्यान पंतप्रधान इम्रान खान यांच्या हेलिकॉप्टर प्रवासामध्ये लाखो रुपयांचा खर्च झाला होता.
इमरान खान यांचा गाडी प्रवास :
सीए नॉलेज यांच्या माहितीनुसार, इम्रान खान 3.5 कोटी रुपयांच्या टोयोटा लँड क्रूझर आणि 12.26 कोटींच्या मर्सिडिज मेबॅक एस600 मध्ये प्रवास करतात.
इम्रान खान यांना अटकेपासून तूर्तास दिलासा
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये आता गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेसाठी पोलिस आल्यानंतर इम्रान खान यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यानंतर आता इम्रान खान यांना लाहोर उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पीटीआय समर्थक आणि पोलिसांमधील दिवसभर चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लाहोर उच्च न्यायालयाने पुढचा आदेश येईपर्यंत पोलीस कारवाईला स्थगिती दिली आहे.