Pakistan Earthquake : पाकिस्तान एकाच दिवसात दोनवेळा भूकंपाने हादरला; जम्मू आणि काश्मीरमध्येही धक्के जाणवले
Pakistan Earthquake : भूकंपाचे धक्के जाणवताच लोक जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेकडे धावले. सध्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.

Pakistan shaken by earthquake twice : थायलंड आणि म्यानमारमधील विनाशकारी भूकंप ताजा असतानाच आज एकाच दिवसात दोनवेळा पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्का बसला. आज (12 एप्रिल) दुपारी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 मोजण्यात आली. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की त्याचे धक्के केवळ पाकिस्तानमध्येच नव्हे तर भारतातही जाणवले. जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेकडे धावले. सध्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
A short while ago: CCTV footage captures the moment a powerful earthquake struck Islamabad, measuring 5.2 on the Richter scale at a depth of 15 km. The intense tremors sparked fear and panic among residents, leaving many in shock and distress. #Earthquake pic.twitter.com/VCSFwWjKxq
— Weather Monitor (@WeatherMonitors) April 12, 2025
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली माहिती
या भूकंपाबद्दल बोलताना, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले की, शनिवारी (12 एप्रिल) दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी मोजली गेली आणि त्याचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होता.
पाकिस्तानला एकाच दिवसात दोनदा भूकंपाचा धक्का
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या अहवालानुसार, आज पाकिस्तानमध्ये एकाच दिवसात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी पाकिस्तानमध्ये पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची खोली पाकिस्तानी जमिनीखाली 10 किलोमीटर खाली जाणवली.
Another Video Emerges as Magnitude 5.2 Earthquake Strikes Islamabad, Pakistan #Earthquake https://t.co/7wRxiON0f4 pic.twitter.com/Qq82p2gOrn
— Weather Monitor (@WeatherMonitors) April 12, 2025
या देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले
पाकिस्तान व्यतिरिक्त आज ताजिकिस्तान आणि पापुआ न्यू गिनीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. आज दुपारी 12 वाजू 24 मिनिटांनी ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजण्यात आली. शनिवारी सकाळी पापुआ न्यू गिनीच्या न्यू आयर्लंड प्रदेशात 6.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) च्या अहवालानुसार, या शक्तिशाली भूकंपाचे केंद्र कोकोपोपासून 115 किमी अंतरावर समुद्रात 72 किलोमीटर खोलीवर होते.
इतर महत्वाच्या बातम्या
























