Pakistan Mosque Blast : पाकिस्तानात (Pakistan) सोमवारी बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. पेशावरमध्ये (Peshawar) सोमवारी नमाज पठणाच्या वेळीच मशिदीमध्ये (Mosque) मोठा बॉम्बस्फोट (Blast in Mosque) झाला. डॉन (Dawn Newspaper) या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या स्फोटात आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शोध आणि बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नमाजा वेळीच मशिदीमध्ये स्फोट झाला, यावेळी मशिदीचा मोठा भाग खाली कोसळला. त्याखाली चिरडून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. 


स्फोटातील मृतांचा आकडा 88 वर


स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, नमाज सुरू असताना मोठा बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला. स्फोट झाल्यावर मशिदीचं छत कोसळलं. नमाज सुरू असताना (Blast in Mosque) हल्लेखोरानं बॉम्बनं स्वत:ला उडवलं. स्फोटातील मृतांचा आकडा 88 वर पोहोचला आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मशिदीच्या कोसळलेल्या छताखाली अद्याप काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. पेशावर बचाव पथकाचे अधिकारी इन्कलाब खान यांनी सांगितलं की, अजुनही मशिदीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.


मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता


खैबर पख्तूनख्वा प्रांताचे गर्व्हनर गुलाम अली यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, सोमवारी नमाज पठणाच्या वेळी ही दुर्घटना घडली. या मशिदीजवळच पेशावरचे पोलीस मुख्यालय आणि इतर सरकारी कार्यालये आहेत. पेशावरमधील उच्च सुरक्षा असलेल्या भागातच हा स्फोट झाला आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


सुमारे 300 लोक नमाज पठण करत होते


दुपारच्या नमाजच्या वेळी हा स्फोट झाला. नमाजच्या पहिल्या रांगेत बसलेल्या आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून खूप जण जखमी झाले आहेत. नमाज पठण करणाऱ्यांमध्ये नागरिकांसह पोलीस अधिकारी, सैन्य दलाचे अधिकारी यांचाही समावेश होता. मशिदीमध्ये सुमारे 300 लोक नमाज पठण करत होते. स्फोटानंतर मशिदीचं छत कोसळलं.


पेशावर पोलीस अधिकारी मोहम्मद एजाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pakistan Blast : नमाज सुरु असताना मशिदीत बॉम्बस्फोट; 150 जखमी