पुणे: राज्यभरातून आलेले वारकरी पुण्यातून वारीसोबत पंढरपुरकडे रवाना झाले आहेत. सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे, अशातच पुण्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आळंदी (Alandi) देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्या वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. श्री निरंजन नाथ यांनी वारकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वारकरी आणि मीडिया प्रतिनिधींशी उद्धटपणे संवाद
ही घटना पालखी सोहळ्यासारख्या पवित्र वातावरणात घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. निरंजन नाथ यांनी मंदिर परिसरात काही वारकरी व पत्रकारांशी उद्धटपणे संवाद साधल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतकंच नव्हे, तर पोलिस कर्मचाऱ्यांशीही त्यांनी अरेरावीने वागणूक दिल्याचा आरोप आहे. त्या वेळी मंदिरात मोठी गर्दी होती आणि सर्वच भाविक शांततेने दर्शनासाठी रांगेत उभे होते, असंही सांगितलं जात आहे.आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ हे पुणे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होते. त्यावेळी त्यांनी काही वारकरी आणि मीडिया प्रतिनिधींशी उद्धटपणे संवाद साधला, असं बोललं जात आहे. या घटनेची माहिती देताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, श्री निरंजन नाथ यांनी पोलिसांशी देखील अरेरावीने वागसे. मंदिरात मोठी गर्दी होती. परंपरेनुसार वारकरी आणि मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशा परिस्थितीत निरंजन नाथ यांच्याकडून गैरवर्तन झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
एका वारकऱ्याने या घटनेवर एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटले, "जेव्हा देवाच्या सेवकांना स्वतःला देवाचा मालक असल्याचा भ्रम निर्माण होतो, तेव्हा ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ उमगतो का?". याचा अर्थ, जेव्हा देवाची सेवा करणारे स्वतःलाच मालक समजायला लागतात, तेव्हा त्यांना खऱ्या ज्ञानाचा अर्थ कळतो का, असा प्रश्न आहे. या घटनेनंतर वारकरी समुदायाने मंदिर प्रशासनाकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वारकरी समुदायाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित विश्वस्तांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंदिर प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. भाविक आणि वारकरी वर्गातून मात्र ही घटना दुर्दैवी आणि अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदायातील ही निष्ठा आणि भावनेची परंपरा कायम राहावी, यासाठी मंदिर प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत, अशी मागणीही वारकरी आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.