Numerology: लग्न म्हणजे अतूट बंधन, हिंदू धर्मानुसार, हे एक पवित्र बंधन आहे, जे तोडणे सहज सोपे नाही. परंतु सध्याचं युग पाहता, बऱ्याचदा हे नाते जास्त काळ टिकत नाही, अंकशास्त्रानुसार, ज्याचे एक मुख्य कारण संख्यांचा प्रभाव देखील असू शकते. प्रत्यक्षात, अंकशास्त्रात प्रत्येक संख्येचे महत्त्व सांगण्यात आले आहे, ज्याचा लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखेच्या लोकांची मैत्री दीर्घकाळ टिकते. त्यांचं नात इतकं मजबूत असतं की ते सहजासहजी कोणीच तोडू शकत नाही. जाणून घेऊया..

'या' जन्मतारखेचे लोक जोडीदारासोबत आयुष्यभर चांगलं जुळवून घेतात!

अंकशास्त्रानुसार  ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, तर अशा लोकांचा मूलांक 3 असतो. तर कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. सहसा, क्रमांक 3 असलेले लोक 6 क्रमांक असलेल्या लोकांशी चांगले जुळवून घेतात. दोघांमध्ये चांगला समजूतदारपणा असतो. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही सांगणार आहोत की, 3 क्रमांक असलेल्या लोकांनी 6 क्रमांक असलेल्या लोकांशी लग्न करावे की नाही? या लोकांचं नातं कितपत टिकते?.

सहजपणे नातेसंबंध तोडत नाहीत...

अंकशास्त्रानुसार, गुरु हा क्रमांक 3 चा स्वामी मानला जातो, तर शुक्र हा क्रमांक 6 चा स्वामी आहे. क्रमांक 3 असलेले लोक उत्साही आणि सर्जनशील असतात. हे लोक आयुष्यात त्यांना हवे असलेले साध्य केल्यानंतरच विश्रांती घेतात. हे लोक आयुष्यात नेहमीच पुढे राहू इच्छितात. त्यांच्या या स्वभावामुळे, अनेक वेळा लोक त्यांच्यापासून दूर जातात. परंतु ते त्यांच्या नात्यांबद्दल खूप सावध असतात. ते सहजपणे नातेसंबंध तोडत नाहीत, तर शेवटच्या श्वासापर्यंत ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे, क्रमांक 6 असलेले लोक प्रेम आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जातात. हे लोक खूप प्रामाणिक असतात आणि प्रत्येक नाते मनापासून जपतात. हे लोक स्वभावाने खूप साधे असतात, जे त्यांचे नाते जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. ते संकटापासून पळून जात नाहीत, परंतु त्यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

या जन्मतारखेच्या लोकांचे लग्न कितपत टिकते?

अंकशास्त्रानुसार, 3 आणि 6 क्रमांकाच्या लोकांमधील नात्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे बंधन खूप मजबूत असते. या लोकांची मैत्री दीर्घकाळ टिकते, जी सहज तुटत नाही. जर हे लोक लग्न करतात तर त्यांचे वैवाहिक जीवन देखील चांगले असते. या लोकांमध्ये खूप प्रेम असते. ते त्यांच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

हेही वाचा :                          

Numerology: बायकोला प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य देतात! 'या' जन्मतारखेचे पती बायकोसाठी वेळात वेळ काढून फिरायला नेतात, बेस्ट हसबंड ठरतात, अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)